ताज्या घडामोडी

मानवत न्यायालयात २८ सप्टेंबर, २०२४ राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

मानवत / प्रतिनिधी.

महारष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांचे आदेशान्वये मानवत तालुका विधी सेवा समिती व वकील संघ मानवत यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ सप्टेंबर, २०२४ शनिवार रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय लोकन्यायालयात तडजोडीस पात्र असलेली फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे तसेच कौटुंबिक वाद असलेली प्रकरणे, धनादेश अनादर केल्याबाबतची प्रकरणे, कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे, पोटगीची प्रकरणे, विविध बँकेची, बीएसएनएल, एमएसईबी, नगर परिषद हद्दीतील घरपट्टी व पाणीप‌ट्टी, तसेच ग्रामीण भागातील घरप‌ट्टी व पाणीपट्टी वसुली, फायनांस कंपनी यांची वाद दाखल पूर्व प्रकरणे व इतर खटले आपसात तडजोड करण्याकरीता ठेवण्यात येणार आहेत. लोकअदालत च्या माध्यमातुन खटले निकाली काढल्यास वेळेची बचत होते. तसेच पश्नकरांचे आप-आपसातील संबंध सुधारण्यास मदत होते. तरी संबंधीत मानवत तालुक्यातील पक्षकारांना व नागरिकांना कळविण्यात येते की, आपली प्रकरणे आपसात तडजोड करण्याकरीता दिनांक २८ सप्टेंबर, २०२४ शनिवार रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय, मानवत येथे सकाळी १०:३० वाजता हजर रहावे व या राष्ट्रीय लोक न्यायालयाचा फायदा नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन मानवत येथील न्यायाधीश तथा मानवत तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री. जी. ए. करजगार व मानवत वकील संघाचे अध्यक्ष श्री. डि. एच. दशरथे यांनी केले आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.