आरोग्य व शिक्षण

एम.जी.एम. कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड आयटीच्या विद्यार्थांची उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर युवक महोत्सव-२०२४ मध्ये पाच पारितोषिकांची कमाई.

नांदेड दिनांक:(संपादक राज गायकवाड)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व सहयोग सेवाभावी संस्थेच्या सयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन “ज्ञानतीर्म-२०२४० या युवक महोत्तावात एम.जी.एम. च्या कॉम्प्यूटर सायन्स अड जायटी महाविद्यालयाच्या विद्यार्थानी उत्कृष्ट कामगिरीने सगळ्यांना प्रभावित करत पाच पारितोषिके पटकावली,

वक्तृत्व कला प्रकारात ऋत्विक खक्के धानी व्दितीय पारितोषिक मिळविले, मुक अभिनय या कला प्रकारात अंजली जाधव, श्रेयश कुलकर्णी, सृष्टी माळगे, पथ उबाळे, रामेश्वर आढाव, गजानन पवार या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून व्दितीय पारितोषिक मिळविले

एकांकिका कला प्रकारत श्रेयश कुलकर्णी, सुष्टी माळगे, मारोती आधव, यश उबाले, सिद्धी जोशी, तिर्थराज धात्रक, सौरभ देशमुख, सिद्धी महाजन आणि अंजली जाथन यांच्या एकांकिकेने तिसरे पारितोषिक मिळविले. विडंबन कला प्रकारात अंजली जाधव, श्रेयश कुलकर्णी, सृष्टी माळगे, पक्ष उबाळे, मधुरा राजूरकर व सिद्धी महाजन यानी तृतीय पारितोषिक मिळविले.

कतात्मक जुळवणी या कला प्रकारात सुधांशु सामलेटी, सिद्धी जोशी, आदित्य मगर, निकिता चव्हाण यानी तृतीय पारितोषिक मिळविले,

युवक महोत्सवासाठी महाविद्यालयाच्या २९ विद्यार्थांनी विविध कला प्रकारात सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ससंस्थेचे अध्यक्ष श्री. कमलकिशोर कदम, संचालीका डॉ. गौता नाठकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष कोटगिरे, कॉम्प्युटर सायन्स अड आयटी विभागाच्या प्रमुख व उपप्राचार्या डॉ. कांचन नांदेडकर, तसेच बायोटेक्नॉलॉजी व बामोइन्फॉरमेटिक्स विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद घेरेकर मांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे

युवक महोत्सवासाठी समन्वयक म्हणून महाविद्यालयातील प्रा.डॉ. स्मिता भोपी, प्रा.डॉ. मयुरी सरसर, प्रा. मनीषा जाधव, प्रा. रामेश्वर बेलनोर, प्रा. सतीश सरकटे, श्री विजय ताटे यांनी काम पाहिले तर सुधीर सूर्यवंशी व हनुमान यनोळगे यांचे सहकार्य युवक महोत्सवासाठी मिळाले.

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.