ताज्या घडामोडी

वसंतरावजींच जाणं निशब्द करणारे..!: मा खासदार प्रताप पाटील चिखलीकर

नांदेड प्रतिनिधी:

राजकारण बाजूला ठेऊन काही नाते संबध जोपासलेही पाहिजे. रविवारी (२५ ऑगस्ट 2024) कालच मी त्यांना भेटायला हैदराबादला गेलो आणि सकाळी वसंतराव गेले ही बातमी समजली.अत्यंत वेदना झाल्या. चिखलीकर परिवार व चव्हाण परिवार नाते संबंधात आम्ही गुंतलेले आहोतच परंतु 1992 पासून दोघेही राजकारणात मित्र म्हणून वावरलो. 1992 पूर्वी आम्ही दोघेही सरपंच होतोत. 1992 ला जिल्हा परिषद सदस्य तेही झाले आणि मीही झालो आणि तेव्हापासून आमच्या मैत्रीचा सहवास सुरू झाला.
२००४ मध्ये मी विधानसभेवर तर वसंतरावजी विधान परिषदेवर होतोत. दोघेही अतिशय मनमोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे नांदेड जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात काम करत होतोत. जिल्हा परिषदमधील मैत्री पुढे आमदारकी मध्येही बहारली. आम्ही मध्यवर्ती बँकेत सुद्धा एकत्रित काम केलं विचाराची प्रगल्भता दिलेरपणा हे ही त्यांचे गुण भावणारे होते.
चव्हाण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या दुःखामध्ये चिखलीकर परिवार सहभागी आहे. ईश्वर चव्हाण कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देओ हीच प्रार्थना करतो
प्रतापराव पाटील चिखलीकर
माजी खासदार ,नांदेड

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.