ताज्या घडामोडी

मानवत नगर परिषदेच्या पाणिपूरवठा विभागात काम करणारे* प्लेंबर यांना तात्काळ कामावर रूजू करा. :प्राचार्य अनंत गहिलोत*

मानवत / प्रतिनिधी.

मानवत नगर परिषदेतील पाणिपूरवठा विभागात काम करणारे प्लेंबर गेल्या अनेक महिण्या पासून कामाचे लाखो रूपये बिल मानवत नगर परिषदेकडून न मिळाल्याने कामावरून घरी बसले आहे. त्यामूळे शहराती लिकिंज चे प्रमाण वाढले त्यामूळे नागरिकांना दूषित पाणि पिण्याची पाळी आली. त्यामूळे अनेकांना आजाराची लागन लागली आहे. तर शहरात लिकिंज पाण्यामूळे नगर परिषदेचे शुध्द पिण्याचे लाखो लिटर पाणी गटारातसह शहरातील मेन रोड वर वाहत आहे. त्यामूळे शहरातील डांबरी मेनरोड खराब होण्याचे संकेत जाणकार व्यक्त करीत आहेत तर आज भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव प्राचार्य अनंत गोलाईत ( गहिलोत ) यांनी पक्षाच्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे मानवत नगर परिषदेतील प्लेंबरचे पेमेंट करून तात्काळ कामावर रूजू करून घ्या व लिकिज चा प्रश्न मार्गीलावून लाखो लिटर वाया जाणारे पाणि वाचवा अशी मागणी मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्याकडे केली.
सविस्तर वृत्त असे की, मानवत नगर परिषदेचे अधिकृत प्लंबर यांचे थकलेल्या लाखो रूपयाचे बिल अदा करा ! व पाणिपूरवठा विभागाचे लाखो लिटर वाया जाणारे पाणि वाचवा मानवत नगर परिषदेचे सर्व अधिकृत प्लवर यांचे मागील दहा महिन्या पासून बिले थकलेली आहेत मानवत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे शहरातील अनेक प्रतिष्ठीत नेते मंडळी यांनी संबंधित लोकांच्या बिलासाठी पाठपुरावा केला परंतु मानवत नगर परिषदेचे लोक कल्याणकारी प्रशासना कडुन उडवाउडवीची उत्तरे मिळत गेली
त्यामूळे मानवत शहरातील सर्व पाणिपूरवठा विभागाचे प्लेंबर यांचे काम बंद असल्याने शहरातील शुध्द पिण्याच्या पाण्याचा पूरवठा करणार्‍या पाईप लाईन नादुरूस्ती, लीकेजेस वाढल्याने पाईप लाईन मध्ये अनेक ठिकाणी अक्षरश सांडपाणी वाहून नेणार्‍या गटाराती नालीचे पाणी पाईपलाईन मध्ये जात आहे तसेच शहरामध्ये वाॅल लिकेजच्या कारणाने अनेक भागात रोज पाणी पुरवठा होत आहे तर काही भागात आठ दिवसाना पाणी पुरवठा होत आहे.
या सर्व बाबींना लोक कल्याणकारी मानवत नगर पालिका प्रशासन जबाबदार असुन मानवत शहरामध्ये साथीच्या आजाराने डोके वर काढले असून मानवत नगर परिषदेच्या अनेक प्रभागामध्ये आजाराचे रूग्ण दवाखान्यात चकरा मारतांनी दिसत आहे. त्यामूळे शहरात अनेक आजार, डेंग्यु आणि ईतर आजार पसरत आहेत तसेच शहरातील रोगराई वाढण्यास मानवत नगर परिषदेचे कल्याणकारी प्रशासन कारणीभूत आहे.
तरी मानवत नगर परिषदेच्या लोक कल्याणकारी प्रशासनाने मानवत नगर परिषदेच्या पाणि पूरवठा विभागात काम करणार्‍या प्लंबरांचे थकलेली लाखो रूपयाची बिले अदा करून तत्काळ कामावर रूजु करण्यात यावे आणि शहरारील वाढलेले पाईपलाईन नादुरती व लीकेजेस दुरूस्त करण्यात यावी अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश संघटन प्राचार्य अनंत गोलाईत ( गहिलोत ) यांनी मानवत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदना द्वारे केली आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.