ताज्या घडामोडी

लोरा येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे जयंती साजरी..

मानवत / प्रतिनिधी.

लोरा तालुका मानवत जिल्हा परभणी येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती प्रा.अंकुश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.लोरा या गावातील शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून अण्णाभाऊ साठे शिवाजी महाराज, लहुजी साळवे, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांविषयी अतिशय चांगले विचार व्यक्त केले.अध्यक्षांनी आपल्या समारोपीय भाषणातून शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले व आपल्या गावातून शिक्षणाची गंगा जोरात वाहत आहे तसेच आपल्या समाजातील युवक युवती चांगले अधिकारी, प्राध्यापक डॉक्टर, वकील व तसेच इंजिनिअर बनतील त्यासाठी त्यांच्या पाल्यांनी देखील त्यांच्या पाठीशी राहुन त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण दिले पाहिजे.हेच खरे अभिवादन या महामानवांच्या जयंती निमित्त ठरेल असे म्हणाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच जगन्नाथ रोडगे, मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामेश्वर जाधव साहेब,माजी सरपंच तुकारामजी जाधव साहेब, माजी सरपंच गौतम अंभोरे साहेब व मी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना परभणी तालुकाध्यक्ष काशिनाथ गायकवाड व लोरा येथील गोपीनाथरावजी गायकवाड साहेब व समस्त समाज बांधव उपस्थित होते.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.