महात्मा गांधी मिशन संचलित कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन “क झोन” स्पर्धेचे आयोजन
नांदेड दि:(संपादक राज गायकवाड) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन “क झोन” स्पर्धेचे आज महात्मा गांधी मिशन संचलित कंप्यूटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयामध्ये फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी एमजीएम संचलित कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष कोटगिरे ,उपप्राचार्य डॉ. कांचन नांदेडकर, विभागप्रमुख डॉ. मकरंद चेरेकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ क्रीडा मंडळाचे सदस्य डॉ. व्ही. एस. कुंटूरवार ,राजीव गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी जाधव, यशवंत महाविद्यालयाची क्रीडा संचालक डॉ. मनोज पैंजणी, पानसरे महाविद्यालय अर्धापूर चे क्रीडा संचालक डॉ. महेश वाकडकर, वसंतराव काळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उस्मान गणी, गुरुगोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयाची क्रीडा संचालक डॉ. भास्कर कदम, पानसरे महाविद्यालयाची डॉ. गजानन कदम तसेच एमजीएम महाविद्यालयाचे क्रीडा संचालक मनोज राठोड प्रा. अर्जुनसिंग गहिरवार,
प्रा. सतीश सरकटे , एमजीएम महाविद्यालयाचे सुरक्षा अधिकारी सुभेदार विश्वनाथ सातपुते पत्रकरिता महाविद्यालयाचे प्रा. राज गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.