वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाला विजेतेपद
नांदेड, दि. (संपादक राज गायकवाड):
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत सुरू असलेल्या क-झोन स्तरीय अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या मुलीच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या वतीने भोकर येथे या कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. महिला कबड्डी स्पर्धेत महाविद्यालयाच्या गौरी दहे या विद्यार्थीनीला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला.
विजयी संघाला प्रशिक्षक म्हणून प्रा. डॉ. राहुल सरोदे, प्रा. डॉ. शेख बुशरा
प्रा. ललिता अय्यर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यापीठ अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल यशस्वी मुलीच्या कबड्डी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे कार्यालयीन अधीक्षक आर.डी. राठोड, डॉ. गणेश ईजळकर, डॉ. शोभा वाळूककर, डॉ. एल. व्ही. खरात, प्रा. शशिकांत हटकर, प्रा. करण हंबर्डे, प्रा. भीमराव वानखेडे, यांच्या सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी इत्यादीने अभिनंदन केले आहे.