मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा फेम अनंत राऊत यांच्या सदाबहार कवितेने व विवीध सामाजिक उपक्रमांद्वारे डॉ. घनश्याम येळने यांचा वाढदिवस साजरा.
नांदेड. दि.२०.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथिल सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. घनश्याम येळणे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी व
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा फेम अनंत राऊत यांच्या सदाबहार कवितेने व अनेक सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. घनश्याम येळणे हे होते तर
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी अनंत राऊत, डॉ. नंदकुमार बोधगिरे, डॉ. प्रमोद लोणारकर, डॉ. बाबुराव जाधव, व्यवस्थापन परिषद सदस्य हणमंत कंधारकर, डॉ. राजकुमार दासरवाड यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर
सामाजिक शास्त्रे संकुलातील सर्व प्राध्यापक वृंदाच्या वतीने संकुल परिसरातील मोकळ्या जागेत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून वाढदिवस करण्यात आला. व सामाजिक शास्त्रे संकुलातील माजी विद्यार्थी
डॉ. प्रशांत घोडवाडीकर यांच्या वतीने धनगरवाडी येथील अनाथ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अन्नदान वाटप करण्यात आले. या कार्यक्रमातील प्रमूख पाहुणे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी अनंत राऊत, यांनी एका पेक्षा एक अशा सदाबहार कविता गाऊन उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच त्यांनी आपली प्रसिद्ध असलेली कविता ” दुःख अडवायला उबऱ्या सारखा,
मित्र असावा वनव्यामध्ये गारव्यासारखा,” भोंगा, प्रेम, शेतकऱ्यावर, अशा अनेक कविता गाऊन सामाजिक समतेचा संदेश विद्यार्थ्यांना त्यांनी यावेळी दिला.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना सत्कारमूर्ती डॉ. घनश्याम येळणे म्हणाले की सर्व महापुरुषांचे विचार अंगी बाळगून त्या दिशेने वाटचाल करावी व विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाबरोबर समाजकार्य देखील करावे असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता नायर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. नितीन गायकवाड यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
व्यवस्थापन परिषद सदस्य हणमंत कंधारकर, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. आनंद घोडवाडीकर, प्रा. रवी मोरताटे,
डॉ. तातेराव पवळे, डॉ. गौतम गायकवाड,डॉ. संदीप जाधव, डॉ.
सचिन खडके, प्रा. गजानन इंगोले, गुलाब हंबर्डे, संजय हंबर्डे, तुकाराम हंबर्डे, नरसिंग कागडा,
विजय हनवते पांगरेकर, संकुलातील सर्व संशोधक विद्यार्थी, यांनी परिश्रम घेतले