क्रीडा व मनोरंजन

म्हाडा कॉलनीत आजपासून हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण

नांदेड, दिनांक 31 नवीन कौठा, म्हाडा कॉलनीतील विठ्ठल रुक्मिणी व हनुमान मंदिरात दरवर्षाप्रमाणे यंदाही दि. एक जानेवापासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायणाला प्रारंभ होणार आहे. सप्ताहात दररोज काकडा आरती भजन, ज्ञानेश्‍वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर व भजन आदी कार्यक्रम होणार आहेत.

सप्ताहात दि. 1 रोजी हभप परमेश्‍वर महाराज कंधारकर (गुरुजी), दि. 2 रोजी हभप तुकाराम महाराज पांचाळ चाटोरीकर, दि.3 रोजी ज्ञानेश्‍वर महाराज वसुरकर (गुरुजी), दि.4 रोजी हभप ब्रह्मानंद महाराज जाहूरकर, दि.5 रोजी राम महाराज पांगरीकर (मुंबई) गुरुजी, दि.6 रोजी हभप दत्ता महाराज वळसंगवाडीकर, दि. 7 रोजी हभप बापुराव महाराज ठाकूरबुआ सावळेश्‍वरकर आणि दि. 8 रोजी हभप भगवान महाराज शेंद्रीकर परभणीकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दि. 8 रोजी सकाळी 8 वाजता माऊली पालखी मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर हभप बापुराव महाराज ठाकूरबुआ सावळेश्‍वरकर यांचे काकडा भजन होईल. दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खा. रवींद्र चव्हाण, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, ना. हेमंत पाटील, आ. बालाजीराव कल्याणकर, आ. आनंदराव बोंढारकर, माजी आ. मोहनराव हंबर्डे, भाजपचे डॉ. संतुकराव हंबर्डे, शिवसेनेचे एकनाथ पवार, माजी नगरसेवक राजु काळे व राजु गोरे, डॉ. अभिषेक सौदे, संगीताताई डक, संजय मोरे, संजय घोगरे, बालाजी पाटील पुणेगावकर, जि.प.सदस्य विजय धोंडगे, भाजपचे सुरेश लोट, नारायण जाधव, योगेश हुंबाड, गोविंदराव धुमाळ, विकास आढाव, शिवाजीराव सोनटक्के यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. तसेच अनंत विभूषित जगद‍्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज व पिठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दि. 7 रोजी नामजप सोहळा पार पडणार आहे.

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.