ताज्या घडामोडी

नेसुबो महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर संपन्न*

नांदेड: प्रतिनिधी

अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रभारी प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. डॉ. कल्पना कदम यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. जीवन मसुरे यांची उपस्थिति होती तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. अतिश राठोड, डॉ. आशा मेश्राम यांच्या सह राज्य आपत्ती प्रतिसाद विभाग धुळे शाखेचे सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते या मध्ये प्रामुख्याने पोलीस निरीक्षक आर. जे. सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. बगाड, एस. ए. संकपाळ यांची उपस्थिति होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न झाल्यानंतर प्रास्ताविक उप-प्राचार्य प्रा. डॉ. कल्पणा कदम यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे असे सांगून विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा निश्चित फायदा होईल असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना श्री. भरत चव्हाण यांनी भूकंप झाल्यानंतर कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यावी आणि त्यामधून आपला बचाव कसा करावा याचे सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. सुनील पारधी यांनी अचानक आग लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता अशा परिस्थितीत संयमाने कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. गणेश धनगर यांनी यांनी पुर परिस्थितीमध्ये लाईफ जॅकेटच्या माध्यमातून आपण आपला बचाव कसा करू शकतो आणि पूर आल्यानंतर कोणती काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तर रियाज शेख यांनी कोणतीही घटना घडल्यानंतर घाबरून न जाता सर्वप्रथम प्रथम उपचार घेणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद विभाग शाखा धुळे येथिल महेश मोरे, निलेश सोनवणे, स्वप्निल पाटील, विजय गवळी, सुरेश गोसावी, प्रवीण पाटील, अमोल चौधरी, समाधान महाजन, मुकेश महाले, किरण माळी, पवन साबळे, दीनानाथ पाटील, हर्षल लोंढे, मदन बाविस्कर, भास्कर काळे व कमलेश पवार या सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जीवन मसूरे यांनी केला आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत असताना अशा पद्धतीच्या प्रशिक्षण शिबिरामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आशा मेश्राम यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी राधिका कोकुलवार हिने केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व महाविद्यालयातील इतर सर्व विद्यार्थी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.