देश विदेश
६५७ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, १५० भूखंड वाटप
गडचिरोली,प्रतिनिधी :-
आत्मसमर्पण योजना सन 2005 मध्ये सुरु झाली असुन आजपर्यंत एकुण 657 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यांच्या पुनर्वसनाकरीता “नवजीवन वसाहतीची” स्थापना करुन 174 भुखंडापैकी 150 भुखंड आत्मसमर्पीतांना वाटप केले आहे.
पोलिसानी पुढाकाराने स्थापन केलेले नवजीवन वसाहतीमध्ये 33 सदस्यांचे घरकुल बांधकाम पुर्ण झालेले असुन 14 सदस्यांचे घरकुल प्रगतीपथावर आहे. तसेच नवजीवन वसाहतमध्ये आत्मसमर्पीतांसाठी सुविधा म्हणुन प्रत्येक घरी नळ, विज, व पथदिवे तसेच समाज मंदिर (गोटुल), माऊली मंदिर चे बांधकाम करण्यात आले. तसेच पाणी पुरवठा योजना, नाली बांधकाम ईत्यादी पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
पोलीस दल व मैत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत एकुण 31 आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांचे सामुहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातुन लग्न करुन देण्यात आले व आजपावेतो 34 आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांची नसबंदी रिओपनिंग करुन देण्यात आली आहे.