एम सी आर
Uncategorized

पीपल्स मध्ये आज परिसंवाद व पुस्तक लोकार्पण सोहळा

नांदेड : पीपल्स कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एकदिवसीय परिसंवाद व पुस्तक लोकार्पण समारंभाचे आयोजन ९ मार्च रोजी नरहर कुरुंदकर सभागृहात केले आहे.
“समकालीन लेखिकांचे साहित्यिक सरोकार” या विषयावर आधारित परिसंवादात विविध मान्यवर वक्ते मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ सकाळी १० वाजता होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. प्रवीण पाटील तर उद्घाटक म्हणून प्रा. श्यामल पत्की यांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख वक्ते प्रार्चाय डॉ.सतीश यादव हे असून प्राचार्य डॉ. एस. जी.भानेगावकर, उपप्राचार्य डॉ.ए. एन. सिद्धेवाड यांची प्रमुख उपस्थिती राहील.
सकाळी ११.३० च्या पहिल्या सत्रात जया जादवानी का रचना संसार’ आणि ‘कैवारी’ या काव्यसंग्रहात चित्रित स्त्री विषयावर डॉ. गोविंद बुरसे, डॉ. बळीराम धापसे हे मांडणी करणार आहेत.
दुपारी २ ते ४ या सत्रात सुशीला टाकभोरें व देवकीनंदन शुक्ल यांचे साहित्यिक योगदान या विषयावर कार्यावर डॉ. जयराम सूर्यवंशी व डॉ. गोविंद शिवशेट्टे हे बोलतील. अध्यक्षस्थानी डॉ. संदीप पाईकराव हे राहणार आहेत.
सायंकाळी ४ वाजता कार्यक्रमाचा समारोप होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. एस. जी. भानेगावकर हे राहणार असून उपप्राचार्य डॉ. सिद्धेवाड, प्राचार्य डॉ. सतीश यादव व प्राे. डॉ. वर्षा सहदेव यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. भगवान जाधव, डॉ. मुकुंद कवडे आहेत.
साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांची गुजरातमधील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

Chief Editor

डॉ. महेश मगर यांच्या पाठपुराव्याला यश; आरआरसी प्रस्ताव सादरीकरणासाठी २० जूनपर्यंत मुदतवाढ

Chief Editor

ग्रामीण मातंग स्त्री ग्रंथास राज्यस्तरीय पुरस्कार

Chief Editor

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे, मुंबईच्या खेळाडूंनी गाजविले मैदान : महापौरांच्या हस्ते बक्षिक वितरण थाटात संपन्न

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये ‘MY Bharat’ विद्यार्थी विशेष नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

Leave a Comment