एम सी आर

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दाताळा कंधार तालुक्यात प्रथम

Uncategorized

नांदेड:

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र.3 मध्ये कंधार तालुक्यातील दाताळा येथील जि.प. शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याचे फलस्वरुप शाळेला रुपये तीन ताखाचे बक्षिस मिळाले आहे, गेले वर्षी सुध्दा या स्पर्धेत ही शाळा तालुक्यात दुसरी आली होती व रुपये दोन लाखाचे बक्षीस मिळाले होते.

या स्पर्धेसाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. जीवनराव पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा बोनगुलवार यांच्या मागदर्शना खाली शाळेने भरीव कामगिरी केली आहे. यात इंटरनेट सुविधेसह संगणक प्रयोग शाळा, विज्ञान प्रयोगशाळा, डिजीटल क्लासरुम, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, ग्रंथालय, क्रिडा साहित्य, आर. ओ.चे शुध्द व थंड पाणी, मुला मुलीसाठी तसेच शिक्षकासाठी स्वतंत्र स्वच्छता ग्रह, हेन्ड वॉश स्टेशन, परसबाग तसेच प्रत्येक वर्गात फॅन, ट्युबलाईट, घडयाळ इत्यादी सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, शाळेत भौतिक सुविधे बरोबरच गुणवतेकडे सुध्दा विशेष लक्ष दिले जाते. त्यात क्रिडा स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भाषण व वादविवाद स्पर्धा इत्यादी स्पर्धेचे आयोजन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांसाठी नवोदय व स्कॉलरशिप परिक्षेची सुध्दा खास तयारी करुन घेतली जाते. शाळेच्या क्रिडा विभागातर्फे खेळा सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, सहली तसेच वनभोजन इत्यादीचे आयोजन केले जाते.
या शाळेच्या यश संपादनात माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष जीवनराव पाटील शिंदे, मुख्याध्यापिका सौ. छाया बोनगुलवार उपक्रमशिल शिक्षिका सौ. वर्षा येणूरे तसेच शिक्षक श्री धुळशेट्टे, श्री. माकणे, श्री. टोम्पे, श्री. बनसोडे, सौ. कोणाळे यांचे सुध्दा मोठे योगदान आहे
या यशाबदल शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत असून शालेय समितीचे अध्यक्ष श्री. प्रदिप शिंदे व देणगीदार डॉ. बायना पांचाळ, श्री. बाबुराव कोपरे, श्री.शिवराज शिदे, श्री. पंडित शिंदे, श्री. प्रकाश शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Share

Related posts

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षणाची सुवर्णसंधी; १३ जून २०२६ पर्यंत अर्ज

Chief Editor

बौद्ध समाजातील महिलांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य; लक्ष्मण ढोबळेंसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

Chief Editor

प्रा. नारायण मोटे : सत्शील, प्रामाणिक व मृदू स्वभाव

Chief Editor

कला प्रदर्शन आणि पुस्तकांच्या एकत्रित वाचनातून यशवंत महाविद्यालयात साजरा होणार हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन

Chief Editor

ज्ञान, संस्कार आणि साधेपणाचा संगम : सौ. निर्मला आनंदराव कदम -खुळे

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शहीद दिन साजरा

Chief Editor

Leave a Comment