एम सी आर
Uncategorized

कला प्रदर्शन आणि पुस्तकांच्या एकत्रित वाचनातून यशवंत महाविद्यालयात साजरा होणार हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन

नांदेड :

१७ सप्टेंबर हा स्वातंत्र्याचे स्मरण करण्याचा दिवस.जुलमी निजामी राजवटीत असताना भाषिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक दास्य असह्य झाल्यानंतर स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने पुकारलेल्या लढ्याचे स्मरण करण्याचा दिवस.केवळ शाब्दिक स्मरण न करता त्याला कृतिशीलतेची जोड देण्याचा हेतू ठेवून यशवंत महाविद्यालयातील वाचन कट्ट्याने हैदराबाद मुक्तिसंग्राम दिवसाच्या निमित्ताने ‘बंधनाकडून मुक्ततेकडे’ हे मध्यवर्ती सूत्र घेऊन कला प्रदर्शन आणि एकत्रित पुस्तक वाचनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

*यशवंत इमॅजिनेशिया- उत्सव कलांचा!*

कला कट्ट्याच्या वतीने ‘कला प्रदर्शन’ (Art Exhibition) आयोजित केले असून यामध्ये रेखाटनं,चित्रं,छायाचित्रं, क्रोशे, मृदमूर्तीकला इ.कलांचा समावेश आहे. या कला प्रदर्शनात जवळपास एकशे एकावन्न ‘कला वस्तू’ पाहण्याची संधी कला रसिकांना मिळणार आहे.

नांदेड येथील कलासक्त वैद्यक तज्ज्ञ डॉ. नितीन जोशी यांच्या हस्ते सकाळी ०८:०० वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर सकाळी ०८:१० ते १०:१० असे दोन तास हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

*यशवंत बिब्लियोफाइल्स-पर्व नववे!*

दुसरा कार्यक्रम ‘यशवंत बिब्लियोफाईल्स’च्या वर्षपूर्तीचा असून मागील वर्षी १७ सप्टेंबर रोजी सुरु झालेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे हे नववे पर्व असणार आहे.

मोबाईलला बाजूला सारुन संगीत व अन्य कला यांच्या सहवासात नव्वद मिनिटे एकत्रित वाचन करण्याच्या या उपक्रमाचे यावेळेचे मध्यवर्ती सूत्र ‘पुस्तकं…जी मुक्त करतात!’ असे आहे.सकाळी ०८:३० वाजता या उपक्रमाचे उद्घाटन दैनिक प्रजावाणीचे संपादक श्री शंतनू डोईफोडे यांच्या हस्ते होणार आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एन.शिंदे हे दोन्ही कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

कला कट्टा,यशवंत बिब्लियोफाईल्स व वाचन कट्ट्याचे सर्व विद्यार्थी मागील पंधरा दिवसांपासून या दोन्ही उपक्रमांच्या आयोजनासाठी मेहनत घेत आहेत.तरी विविध कलांचे रसिक तसेच पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या वाचकांनी या उपक्रमांना भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा,असे आवाहन वाचन कट्ट्याचे संकल्पना-समन्वयक डॉ.विश्वाधार देशमुख तसेच कला कट्टा व यशवंत बिब्लियोफाईल्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Share

Related posts

यशवंत ‘मधील डॉ.मीरा फड यांची आयआयपीएच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

Chief Editor

तरुणांनी पुस्तकांच्या अधिक जवळ गेले पाहिजे : ना. हेमंत पाटील

Chief Editor

रोलर रिलेमध्ये सर्वोदय स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

Chief Editor

*प्रा.गुंजकर यांचे सामुद्रिक जलतरणातील सुयश स्तुत्य -प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे

Chief Editor

भक्ती आणि शक्ती हे आयुष्य जिंकण्याचे सूत्र – संजय भोसले

Chief Editor

थायरॉइड नियंत्रणासाठी नैसर्गिक उपाय | फिटनेस स्टुडिओकडून हमखास मार्गदर्शन: मीरा धुळगुंडे आरोग्य सल्लागार

Chief Editor

Leave a Comment