एम सी आर
Uncategorized

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षणाची सुवर्णसंधी; १३ जून २०२६ पर्यंत अर्ज

अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रामसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू*l

नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (AEDP) अंतर्गत विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी १३ जून २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नियमित पदवी शिक्षणासोबत उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष प्रशिक्षण (Apprenticeship) दिले जाणार आहे. विशेषतः सहाव्या सत्रात अप्रेंटिसशिपची संधी उपलब्ध होणार असून Earn and Learn ( कमवा आणि शिका) चा लाभही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
विद्यापीठाच्या विविध संकुळामध्ये बी.एस्सी. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, बी.एस्सी. शुगर अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजी, बी.एस्सी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड आयओटी, बी.एस्सी. हर्बल टेक्नॉलॉजी, बी.एस्सी. डेटा सायन्स, बी.कॉम. बँकिंग अँड टुरिझम तसेच बी.ए. कंटेंट अँड क्रिएटिव्ह रायटिंग हे अभ्यासक्रम उपलब्ध असून प्रत्येक अभ्यासक्रमासाठी ४० प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे.
प्रवेशासाठी १२ वी विज्ञान अथवा समकक्ष पात्रता आवश्यक असून काही अभ्यासक्रमांसाठी पीसीएम गटाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. बी.कॉम. आणि बी.ए. अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकतात.
विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, बस सुविधा, शासन शिष्यवृत्ती, ग्रंथालय, वाय-फाय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन नोंदणीसाठी विद्यापीठाच्या ई-समर्थ पोर्टलला भेट द्यावी. तसेच संबंधित अभ्यासक्रमांच्या समन्वयकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. AEDP कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. बी. एस. सुरवसे (9075829767) आणि आयआयएलचे संचालक डॉ. शैलेश वाढेर ( 9420683967) यांनी विद्यार्थ्यांना या रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Share

Related posts

अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी आत्महत्या हा पर्याय नाही; मदत मागा, आयुष्याला नवी दिशा द्या

Chief Editor

दिव्यांगता ही दया नव्हे, अधिकारांचा विषय* — डॉ. डी. एस. यादव

Chief Editor

व्यवस्था बदलल्याशिवाय स्त्रीमुक्ती अशक्य – कॉ. किरण मोघे

Chief Editor

स्वा.रा.ती.म. विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रात ‘डेव्हलपमेंट स्टडीज’ पदविका अभ्यासक्रम सुरू – डॉ. महेश मगर

Chief Editor

पीपल्स मध्ये आज परिसंवाद व पुस्तक लोकार्पण सोहळा

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये सुरेश धूत संचालित ध्यानधारणा उपक्रमाचे आयोजन

Chief Editor

Leave a Comment