एम सी आर

यशवंत ‘मध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत विशेष व्याख्यान संपन्न

Uncategorized

नांदेड:(दि.५ जानेवारी २०२६)
राष्ट्रीय सेवा योजना विभाग, यशवंत महाविद्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते तर प्रमुख व्याख्याते श्री.विजयकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस, नांदेड हे होते.
श्री. विजयकुमार पाटील यांनी, दरवर्षी होणाऱ्या अपघातांविषयी आकडेवारी देताना त्यांच्या गंभीरतेबद्दल जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. वाहतुकीचे नियम किती महत्त्वाचे आहेत, व ते कसं जीव वाचू शकतात, या संदर्भात त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान रस्ता सुरक्षा या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथम कु. कोमल कागदेवाड, द्वितीय विनायक धनवे तर पूजा घुले ही विद्यार्थिनी तृतीय आलेली आहे. राष्ट्रीय महामार्ग पोलीस यांच्या वतीने विजेत्यांना हेल्मेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कोमल कागदेवाड यांनी तर प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमअधिकारी डॉ. कैलाश इंगोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. राजरत्न सोनटक्के प्रा. राजश्री भोपाळे आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.

Share

Related posts

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

Chief Editor

यशवंत ‘युवकांचा .डी.पी. सावंत यांच्या उपस्थितीत द्विमार्गी ऑनलाईन संवाद

Chief Editor

बंजारा समाज जोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल

Chief Editor

मांडवीत बालमित्र मेळावा संमेलन उत्साहात; 23 वर्षांनंतर मित्रांची भावनिक भेट

Chief Editor

पालकमंत्री अतुल सावे यांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे घेतले दर्शन*

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षणाची सुवर्णसंधी; १३ जून २०२६ पर्यंत अर्ज

Chief Editor

Leave a Comment