एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘मध्ये टीबी मुक्त भारत अभियान जनजागृती संपन्न

नांदेड :(दि. ३ सप्टेंबर २०२६)
यशवंत महाविद्यालयात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत क्षयरोगाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या अभियानांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी व एनसीसी कॅडेट्समध्ये क्षयरोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, तपासणी व उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. क्षयरोगाचे लवकर निदान व योग्य उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे क्षयरोगाबाबत असलेले गैरसमज दूर करून समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी शहर क्षयरोग अधिकारी डॉ. मोहम्मद बदीओदिन यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सुपरवायझर बालाजी साखरे, राम सोळंके व व्यंकटेश राठोड यांनी अभियानाची माहिती देत विद्यार्थ्यांना क्षयरोगमुक्त भारतासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.एन.एन. कंचटवार, एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट प्रा. श्रीकांत सोमठाणकर, प्रा. प्रियंका सिसोदिया (जीसीआय), एनसीसी कॅडेट्स तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक डॉ.सागर कुलकर्णी यांनी केले. ‘टीबी हरेल, भारत जिंकेल’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्षयरोग प्रतिबंध व जनजागृतीबाबत सकारात्मक संदेश निर्माण झाला.
शेवटी आभार जेयूओ बापूराव नवरखेले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एसयूओ रणवीर ठाकूर, जेयूओ रविकांत कांबळे, समीक्षा पावडे, संजना कांबळे यांनी परिश्रम घेतले तसेचं उपप्राचार्य प्रा.वंदना बदने, डॉ.अजय गव्हाणे, संदीप पाटील, गजानन पाटील आणि जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.

Share

Related posts

संघर्षातून घडलेला कर्मयोगी : आय.ए.एस. ‘तुकाराम

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये पर्यावरणशास्त्र विभागातर्फे इंडक्शन प्रोग्राम उत्साहात संपन्न

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये कालवश राधाबाई पिराजी वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

बारावीनंतर करिअरची नवी दिशा; स्वावलंबी होण्यासाठी विद्यापीठाची सुवर्णसंधी

Chief Editor

सतत बत्तीस दिवस ‘कृष्णाकाठ’चे अभिवाचन करुन यशवंतराव चव्हाण यांना अनोखे अभिवादन!

Chief Editor

Leave a Comment