नांदेड : वासुदेव समाज सेवा संघ, महाराष्ट्र राज्य मुख्यालय नांदेड यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे.
कार्यक्रमानिमित्त दहीहंडीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, वासुदेव समाज बांधवांसह भाविक भक्त आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम श्री साईबाबा मंदिर, कॅनल रोड, चैतन्य नगर, तरोडा(बु.), नांदेड येथे होणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित या सोहळ्यात धार्मिक वातावरणासोबतच गोपाळकाला व दहीहंडीचा उत्साह अनुभवता येणार आहे.
“समाज बांधव, भाविक भक्तांचे व मान्यवरांचे हार्दिक स्वागत” असे आवाहन वासुदेव समाज सेवा संघ, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
