एम सी आर
Uncategorized

स्वारातीम’ विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील साळवे यांना संगणक शास्त्रात पीएच.डी.

नांदेड (डॉ. प्रवीणकुमार सेलुकर )
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील परीक्षा विभागात सिनिअर प्रोग्रामर म्हणून कार्यरत असलेले विलास पुंजाराम साळवे यांना संगणक शास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांचा संशोधन विषय “Development of different Deep Learning Techniques for Brain Tumor Analysis” असा असून, या संशोधनासाठी त्यांना डॉ. अर्चना साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
विशेष म्हणजे साळवे यांनी परीक्षा विभागातील त्यांच्याकडे असलेली परीक्षेशी संबंधित सर्व कामे व्यवस्थित सांभाळून किंवा त्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम न होता आपली विद्यावाचास्पती पूर्ण केली आहे.
दि. १६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन तसेच परीक्षा विभागाचे संचालक श्री. हुशारसिंग साबळे यांच्या हस्ते साळवे यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली व त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या यशाबद्दल विद्यापीठातील सर्व अधिष्ठाता, अधिकारी व कर्मचारी यांनी साळवे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
——————————

Share

Related posts

आधुनिक व पुरोगामी :डॉ. व्ही. एन. इंगोले’. लेखक- डॉ. अजय गव्हाणे

Chief Editor

सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ; फुले-आंबेडकर विचार आचरणात आणा – कुलगुरू डॉ मनोहर चासकर

Chief Editor

फुले-शाहू-आंबेडकर विचारांवर ‘शताब्दी २०२६’ अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

ऊध्दव हरकाळ यांचा अल्काताई सोळंके, सोरेकर यांच्या हस्ते सत्कार.

Chief Editor

शुक्रवारी माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह व रोजगार मेळावा*

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठाच्या बहिस्थ शिक्षण विभागाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

Chief Editor

Leave a Comment