एम सी आर

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने विद्यापीठात ‘पीएच.डी. एंड-टू-एंड’ सॉफ्टवेअर पोर्टलचा शुभारंभ

Uncategorized

*संशोधन प्रक्रियेत पारदर्शकता, गती आणि सुलभता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण डिजिटल पाऊल*

नांदेड: (डॉ.प्रविणकुमार सेलूकर)

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात संशोधन प्रक्रियेत पारदर्शकता, गती आणि सुलभता आणण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘पीएच.डी. एंड-टू-एंड’ (Ph.D. End to End) सॉफ्टवेअर पोर्टलचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते या डिजिटल प्रणालीचा शुभारंभ झाला.

या नव्या प्रणालीमुळे विद्यापीठातील जुन्या तसेच नवीन संशोधक विद्यार्थ्यांना त्यांच्या पीएच.डी. संशोधन प्रक्रियेतील विविध टप्प्यांचे ऑनलाईन ट्रॅकिंग करता येणार आहे. त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांचा वेळ व श्रम वाचण्यासोबतच संशोधनाशी संबंधित प्रशासकीय प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

‘पीएच.डी. एंड-टू-एंड’ पोर्टलच्या माध्यमातून संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रक्रियेतील विविध बाबी ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येणार आहेत. यामध्ये जुन्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, आर.ए.सी. अर्ज प्रक्रिया, पात्रता अर्ज, कोर्स वर्क परीक्षा, संशोधन विषय मान्यतेसाठी आर.आर.सी. प्रक्रिया, सहामाही प्रगती अहवाल, प्रकाशित संशोधन कागदपत्रांची नोंदणी, वाङ्मयचौर्य तपासणीसाठी ऑनलाईन सिनॉप्सिस अपलोड, प्री-वायव्हा, अंतिम सिनॉप्सिस सादरीकरण, ऑनलाईन थेसिस सबमिशन तसेच ऑनलाईन पीएच.डी. अवॉर्ड लेटर आदी सुविधांचा समावेश आहे. यामुळे पीएच.डी.च्या सुरुवातीपासून अंतिम पदवी प्रदान होईपर्यंतची प्रक्रिया एकाच डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून अधिक सुलभपणे हाताळता येणार आहे.

या महत्त्वपूर्ण सॉफ्टवेअरच्या विकास व अंमलबजावणीसाठी विद्यापीठाचे डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ.एम.के. पाटील, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.पराग खडके, डॉ.चंद्रकांत बाविस्कर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे, ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. सिस्टम एक्सपर्ट शिवलिंग शंकरराव पाटील आणि त्यांच्या संपूर्ण तांत्रिक टीमने या प्रणालीच्या निर्मिती व अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या प्रकल्पासाठी पदव्युत्तर विभागाचेही संपूर्ण सहकार्य लाभले. प्रशासकीय पातळीवर सहाय्यक कुलसचिव तुकाराम बुरके, बालाजी बोगार, रेखा लोखंडे, सीमंतिनी राहटीकर, माजी उपकुलसचिव मेघश्याम साळुंके आणि सहा. कुलसचिव पी. ए. कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच या विभागाचे माजी कर्मचारी के. डी. पाटील, हेमलता पाटील, गोविंद हंबर्डे, संदीप नांदगावकर, साजीद पठाण आणि शंकर हंबर्डे यांचेही या प्रणालीच्या निर्मिती व अंमलबजावणीत योगदान राहिले. तसेच ज्ञान स्त्रोत केंद्रातील डॉ. अरुण हंबर्डे यांचे सहकार्य लाभले. याशिवाय संलग्न संशोधन केंद्रांचे प्रमुख व समन्वयक यांच्यासह सर्व संशोधन मार्गदर्शक (Supervisors) यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

विद्यापीठातील संशोधन प्रक्रियेचे डिजिटलायझेशन करण्याच्या दिशेने ‘पीएच.डी. एंड-टू-एंड’ पोर्टल हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या प्रणालीमुळे संशोधक विद्यार्थ्यांना आपल्या संशोधनाच्या प्रगतीची माहिती अधिक सुलभतेने मिळणार असून संबंधित प्रक्रियेतील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. भविष्यात विद्यापीठातील पीएच.डी. प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यास या प्रणालीचा उपयोग होणार आहे.

—————————

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला OJT व Internshipची संधी उपलब्ध करून देण्यासाठी टास्क फोर्सची बैठक

Chief Editor

संत गाडगेबाबा यांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्नशील – महापौर कविता मुळे

Chief Editor

यशवंत महाविद्यालयातील ‘वाचन कट्ट्याचे’ प्रथमेश तेलंग आता ‘झी-२४ तास’चे दिल्ली प्रतिनिधी!

Chief Editor

यशवंत ‘ मधील श्रेयस चव्हाण यांची भारतीय नौसेनेमध्ये निवड

Chief Editor

नेसुबो महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

Chief Editor

महिला दिना निमित्त राज्य महिला आयोगच्या अध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते भित्तिपत्रका चे विमोचन

Chief Editor

Leave a Comment