एम सी आर

यशवंत ‘ मधील श्रेयस चव्हाण यांची भारतीय नौसेनेमध्ये निवड

Uncategorized

नांदेड:( दि.२ फेब्रुवारी २०२६)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचा कॅडेट श्रेयश चव्हाण याची भारतीय नौसेनेमध्ये निवड झाली आहे. भारतीय नौदलाचे जहाज चिल्का हे भारतीय नौदलातील खलाशी अग्निविरांसाठी एक प्रमुख मूलभूत प्रशिक्षण संस्था आहे आणि ते एका व्यापक प्रशिक्षण पद्धतीद्वारे भरती झालेल्यांना सुरुवातीपासूनच प्रशिक्षण देण्याचे काम करते. आयएनएस चिल्का हा भारतातील ओडिशा राज्य स्थित एक भारतीय नौदल तळ आहे.
या निवडीबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी श्रेयस चव्हाण यांचे यथोचित स्वागत करून निवड आणि प्रशिक्षणाबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राजीव गांधी महाविद्यालय, मुदखेड येथील प्राचार्य डॉ. ए. टी. शिंदे, एनसीसीचे लेफ्टनंट प्रा. श्रीकांत सोमठाणकर, कार्यालयीन अधीक्षक गजानन पाटील यांची उपस्थिती होती.
तसेच उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर प्रा.प्रियंका सिसोदिया, डॉ.एल. व्ही. पदमारानी राव, डॉ.साहेब शिंदे, प्रा. माधव दुधाटे, लेफ्टनंट डॉ.रामराज गावंडे, डॉ. अजय गव्हाणे, प्रा.ओमप्रकाश गुंजकर, प्रबंधक संदीप पाटील, कालिदास बिरादार, अभय थेटे, जगन्नाथ महामुने आदींनी अभिनंदन केले आहे.

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठाचा मान उंचावला; डॉ. सिंकू कुमार सिंग एआययूमध्ये जॉईंट सेक्रेटरी

Chief Editor

प्रथम घटक चाचणी परीक्षेची गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पाहणी शालेय परीक्षा व्यवस्था व शैक्षणिक कामकाजाबाबत समाधान व्यक्त

Chief Editor

कोण होते डॉ. नरेंद्र दाभोलकर?, कोण होते कॉ. गोविंद पानसरे?, कोण होते एम. एम. कलबुर्गी? व कोण होत्या गौरी लंकेश? या पुस्तिकांचे लोकार्पण

Chief Editor

ज्ञान, संस्कार आणि साधेपणाचा संगम : सौ. निर्मला आनंदराव कदम -खुळे

Chief Editor

आनंदा वैदिक मॅथ अकॅडमीचे राज्यस्तरीय सुयश

Chief Editor

यशवंत युवक महोत्सवातील बोधचिन्ह स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

Leave a Comment