एम सी आर

संत गाडगेबाबा यांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्नशील – महापौर कविता मुळे

Uncategorized

नांदेड (प्रतिनिधी): संत गाडगेबाबा यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणाचा प्रसार आणि स्वच्छतेचा संदेश देत आयुष्यभर समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे मत महापौर कविता मुळे यांनी व्यक्त केले.

शहरातील चैतन्य नगर परिसरातील नियोजित जागेत मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पुतळा उभारणीसाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही महापौरांनी दिली.

शहरातील आयटीआय परिसरात महाराष्ट्र राज्य धोबी सेवा मंडळ, जिल्हा शाखेच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास परीट धोबी सेवा मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे, उद्योजक बालाजी ईबितदार, विठ्ठल पावडे, आनंद कल्याणकर, डॉ. पांडुरंग विभुतवार, रामेश्वर वाघमारे, डॉ. आशा विभुतवार, सटवाजी माचनवार आदी मान्यवर उपस्थित होते.

जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष रामेश्वर वाघमारे, सुनील लोनवंडे, कार्याध्यक्ष माधव फुलवळकर, जिल्हा सचिव राजेश मांजरकर, बालाजी लक्षकरे, आयोजक माधव नायके, शिवाजी उगले, गणेश शिलेवाड, विवेक चिंचडवाड, मारोतराव ढाणकीकर, गंगाधर निमलवार, राहुल चिंचडवाड, डॉ. विभुतेवार, एम. डी. सूर्यवंशी, जमणाजी इबीतदार, साई तेलंग, केशव नायके, बाबाराव इबीतदार, शंकर इबीतदार, सई शिलेवार, अवधूत शिलेवर, लक्ष्मण शिल्लेवार, संभाजी शिलेवार, साई मचणवाड, सतीश इबीतवार, हरी तेलंग, श्याम तेलंग, मलेश रागेला, भरत शिंदे, राजू रहाटे, गणेश साखरे आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी समाजोपयोगी उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Share

Related posts

यशवंत ‘मध्ये इंग्रजी विभागातर्फे शिक्षक दिन उत्साहात संपन्न

Chief Editor

विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी OJT व Internship महत्त्वपूर्ण : डॉ. अशोक महाजन

Chief Editor

अविष्कार स्पर्धेसाठी पोस्टर व पोडियम प्रस्तुतीकरण कौशल्यावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

Chief Editor

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनास उत्स्फूर्त सुरुवात

Chief Editor

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या सांगडीतूनच ऊर्जा स्त्रोतांची पुनर्निर्मिती शक्य – प्रो. री-ची मुराकामी

Chief Editor

प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांना भगिनीशोक — आशाताई कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन;

Chief Editor

Leave a Comment