एम सी आर
Uncategorized

यशवंत’मधील संशोधक भारत कदम यांना पीएच.डी. प्राप्त

*‘
नांदेड : (दि.७ जानेवारी २०२६)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र संशोधन केंद्रातील संशोधक भारत रावसाहेब कदम यांना ‘बायलॉजिकल स्टडीज ऑन सिस्टोड पॅरासाईट्स ऑफ मॅमल्स’ या विषयावर प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय शामराव नंनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी) पदवी प्राप्त झाली आहे.
या संशोधनात त्यांनी सिस्टोड परजीवींचे वर्गीकरण, जैवरासायनिक अभ्यास, पापुलेशन डायनॅमिक्स तसेच हिस्टोपॅथोलॉजी या विविध पैलूंवर सविस्तर अभ्यास केला आहे.
या संशोधनाच्या अनुषंगाने त्यांचे तीन दर्जेदार संशोधन पेपर्स नामांकित संशोधन जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी संशोधक भारत रावसाहेब कदम व त्यांचे मार्गदर्शक डॉ. संजय शामराव नंनवरे यांचा सत्कार करून त्यांच्या भावी शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सुयशाबद्दल उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ. पद्माराणी राव, डॉ.एच.एल. तमलूरकर, डॉ. निताराणी जैस्वाल, डॉ.डी.बी.भुरे, डॉ.बी. बालाजीराव, डॉ.दीप्ती तोटावार, प्रा. साहेबराव माने,प्रा.नारायण गव्हाणे, डॉ. अजय गव्हाणे, डॉ. शिवराज बोकडे, प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

Share

Related posts

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा;

Chief Editor

प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे हैदराबाद येथे राष्ट्रस्तरीय प्लॅटिनम पारितोषिकाने सन्मानित

Chief Editor

विकास, गुंतवणूक व रोजगार निर्मितीला चालना देणारा अर्थसंकल्प: आरिफ खान

Chief Editor

योग ही विज्ञाननिष्ठ संकल्पना -प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे

Chief Editor

शिबिरार्थी डॉ.अजय गव्हाणे संचालित ध्यानप्रयोगांनी ध्यानमग्न

Chief Editor

दिव्यांगता ही दया नव्हे, अधिकारांचा विषय* — डॉ. डी. एस. यादव

Chief Editor

Leave a Comment