एम सी आर

स्वारातीम’ विद्यापीठात ‘कला आणि संस्कृती उन्हाळी शिबिरा’चा थाटात समारोप

Uncategorized
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची प्रमुख उपस्थिती; विद्यार्थ्यांचा कलाविष्कार आणि पालकांचा उदंड प्रतिसाद
नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ‘विद्यार्थी विकास विभाग’ आनी ‘ललित व प्रयोगजीवी कला संकुल’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘कला आणि संस्कृती उन्हाळी शिबिर २०२६’ चा समारोप सोहळा दी .२० मे २०२६ रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला. ५ ते २० मे या कालावधीत चाललेल्या या १५ दिवसीय शिबिराचा निरोप समारंभ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी शिबिरात सहभागी झालेल्या मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू म्हणाले की, “अशा शिबिरांमुळे लहान मुलांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ आणि वाव मिळतो. लहान वयातच मुलांनी वादन, संगीत व इतर कलांचे शिक्षण घेतले, तर भविष्यात ते उत्तम कलाकार म्हणून नावलौकिक मिळवतील.” आपल्या मुलांमधील कलागुणांचा झालेला सकारात्मक विकास पाहून उपस्थित पालकांनीही विद्यापीठाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
५ ते १५ वयोगटातील मुला-मुलींसाठी आयोजित या शिबिरात नृत्य, नाट्य, गायन, वादन, छायाचित्रण (फोटोग्राफी) आणि चित्रकला अशा विविध कलाप्रकारांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. या संपूर्ण कालावधीत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ प्रशिक्षकांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. यामध्ये प्रामुख्याने,निवेदिता घोडेकर,राजेश सरोदे,श्वेता करोसिया,अश्विनी भालेकर,गिरीश जोंधळे,नामदेव बोम्पिलवार,दिनेश कवडे,अश्विनी टिंगरे,अंकुश डाखोरे (वादक) यांचा समावेश होता.
‘धमाल, मौज, गंमत, शिक्षण आणि सर्जनशीलता’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या शिबिराचे नेटके आयोजन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर व ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. तर शिबिराचे समन्वयक प्रा. राहुल गायकवाड, डॉ. शिवराज शिंदे आणि सहसमन्वयक कैलास एन. पुपुलवाड यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम संयोजन व व्यवस्थापन केले.उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना कला शिकून सर्जनशील होण्याची उत्तम संधी या शिबिराच्या माध्यमातून मिळाल्याबद्दल पालकांनी विद्यापीठ प्रशासनाचे मनापासून आभार मानले.
Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये ‘MY Bharat’ विद्यार्थी विशेष नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांच्या सूचना महत्त्वपूर्ण: -प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नांदेड प्रशासन सतर्क नांदेड जिल्ह्यात जीवित व वित्तहानी नाही नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री अतुल सावे

Chief Editor

शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन — डॉ. शेखर घुंगरवार

Chief Editor

Leave a Comment