एम सी आर
Uncategorized

महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांच्या सूचना महत्त्वपूर्ण: -प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे

नांदेड:( दि. १ फेब्रुवारी २०२६)
यशवंत महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करण्यासाठी आयसर, पुणे येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांचे दर्जेदार संशोधन पत्रिकेमध्ये शोधनिबंध देखील प्रकाशित झालेले आहेत. कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी ॲड ऑन आणि व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस, आयसीटी सुविधा, स्मार्ट बोर्ड, महाविद्यालयाचे सॉफ्टवेअर इत्यादी सुविधांद्वारे अभ्यासाबरोबरच शिक्षणेतर व शिक्षणपूरक सुविधा नित्य दिल्या जातात; मात्र महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांच्या सूचना देखील महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी केले.
यशवंत महाविद्यालयात दि. ३१ जानेवारी रोजी आयोजित पालक शिक्षक मेळाव्याच्या अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते.
प्रमुख अतिथी श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर यांनी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी संस्था व महाविद्यालय सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पालकांनी देखील जागरूक राहून या सर्व बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे, असे आवाहन केले. याप्रसंगी कार्यकारिणी सदस्य श्री. पांडुरंगराव पावडे यांचे समायोचित भाषण झाले. उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे आणि डॉ. हरिश्चंद्र पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी प्रास्ताविकात समन्वयक डॉ. शिवराज शिरसाठ यांनी, पीपीटीद्वारे विद्यार्थ्यांची दररोज ऑनलाईन हजेरी, विविध विभागातील दर्जेदार प्रयोगशाळा, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, महाविद्यालयाचे ग्रंथालय, विद्यापीठ गुणवंतांची माहिती, क्रीडा विभाग, इनडोअर स्टेडियम, मुलांचे वसतिगृह, प्लेसमेंट सेल, यशवंत युवक महोत्सव, आदी सर्व सेवा सुविधाविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात सुधाकर राठोड, सूर्यकांत पुणेवाड, मीरा वाघमारे, श्री. शेख, सैफ सर्वरी इ. पालकांनी उत्स्फूर्त मनोगत व्यक्त केले.
उत्कृष्ट व अनौपचारिक सूत्रसंचालन डॉ.दिगंबर भोसले यांनी केले आणि प्रा. भारती सुवर्णकार यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मीरा फड, डॉ.धनराज भुरे, प्रा. नारायण गव्हाणे, प्रा.परम चिकटे, डॉ.रमेश चिल्लावार, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, अभय थेटे आदींनी सहकार्य केले. मेळाव्यास पालक, विद्यार्थी, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share

Related posts

मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात सुरूपरीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता पथक कार्यर

Chief Editor

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठा निर्णय! लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे यांना मतदानाचा अधिकार बिनविरोध.

Chief Editor

स्वा. रा. ती. म. विद्यापीठाचा संघ राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी रवाना

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Chief Editor

ज्ञान, संस्कार आणि साधेपणाचा संगम : सौ. निर्मला आनंदराव कदम -खुळे

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठामार्फत स्वयम प्लॅटफॉर्मद्वारे पीएच.डी. कोर्सवर्कवर एकदिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण

Chief Editor

Leave a Comment