एम सी आर

सब-ज्युनिअर राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नांदेडच्या खेळाडूंची दमदार कामगिरी महाराष्ट्र संघाचा ओव्हरऑल चॅम्पियनशिपवर कब्जा

Uncategorized

नांदेड, प्रतिनिधी : मध्यप्रदेशातील इंदूर येथे दि. १७ ते २१ जून २०२६ या कालावधीत झालेल्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट कामगिरी करत ओव्हरऑल चॅम्पियनशिप पटकावली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी स्पर्धेत एकूण ४४ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ६० कांस्य पदके जिंकून सर्वोत्कृष्ट संघाचा मान मिळविला.

या स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातील ज्योतिरादित्य मुठे, भार्गवी भंडारी, अर्णव कुमठेकर आणि सुखवीर बुट्टर यांची महाराष्ट्र संघात निवड झाली होती. या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत नांदेड जिल्ह्याचा गौरव वाढविला.

स्पर्धेत ज्योतिरादित्य मुठे याने एक सुवर्ण व एक कांस्य पदकाची कमाई केली, तर भार्गवी भंडारी हिने एक रौप्य पदक पटकावले. अर्णव कुमठेकर व सुखवीर बुट्टर यांनीही महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय खेळाचे प्रदर्शन केले.

या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक दीपा गवळे आणि गणेश सावरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रशिक्षणामुळे आणि खेळाडूंच्या कठोर परिश्रमामुळे हे यश संपादन करता आले.

या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शेलार, सचिव धीरज वाघमारे, तसेच नांदेड जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशनचे सचिव किरण गवळे यांनी पदक विजेते, सहभागी खेळाडू, त्यांचे पालक आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय स्तरावर नांदेडच्या खेळाडूंनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share

Related posts

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे, मुंबईच्या खेळाडूंनी गाजविले मैदान : महापौरांच्या हस्ते बक्षिक वितरण थाटात संपन्न

Chief Editor

यशवंत ‘ मधील एनसीसी कॅडेट्सची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Chief Editor

आनंदा वैदिक मॅथ अकॅडमीचे राज्यस्तरीय सुयश

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

अण्णा भाऊ साठे जागतिक कीर्तीचे महान मानवतावादी लेखक : डॉ. शरद गायकवाड*

Chief Editor

Leave a Comment