एम सी आर

जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त नांदेडमध्ये भव्य ‘वॉकथॉन’ व मोफत COLS जनजागृती उपक्रम सोसायटी ऑफ अ‍ॅनेस्थेसिओलॉजिस्ट, नांदेडतर्फे १८ ऑक्टोबर रोजी आयोजन; सर्व नांदेडकरांना सहभागी होण्याचे आवाहन

Uncategorized

नांदेड : जागतिक भूलशास्त्र दिनाचे (World Anaesthesia Day) औचित्य साधून सोसायटी ऑफ अ‍ॅनेस्थेसिओलॉजिस्ट, नांदेड (SAN) यांच्या वतीने रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध सामाजिक, आरोग्यविषयक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विशेषतः सर्वसामान्य नागरिकांसाठी वॉकथॉन तसेच आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्यास उपयुक्त ठरणाऱ्या COLS (Compression Only Life Support) व पंचरक्षक विषयी प्रात्यक्षिक व जनजागृती करण्यात येणार आहे.

सकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान वॉकथॉन आयोजित करण्यात आली असून ती ITI येथील महात्मा फुले पुतळ्यापासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जाईल. निरोगी जीवनशैली, आरोग्याविषयी जागरूकता आणि आपत्कालीन जीवनरक्षक कौशल्यांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. नांदेड शहरातील नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक तसेच कुटुंबांनी मोठ्या संख्येने वॉकथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन SAN तर्फे करण्यात आले आहे.

यानंतर सकाळी ८ वाजता नांदेड रेल्वे स्टेशन येथे COLS जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका येऊन ती बेशुद्ध पडल्यास आणि हृदयक्रिया थांबल्यास, वैद्यकीय मदत उपलब्ध होईपर्यंत जवळच्या व्यक्तीने योग्य पद्धतीने केलेले Chest Compressions जीव वाचविण्यास अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामुळे COLS हे केवळ डॉक्टरांनीच नव्हे, तर प्रत्येक सामान्य नागरिकाने शिकण्यासारखे जीवनरक्षक कौशल्य आहे.

“आपत्कालीन प्रसंगी डॉक्टर किंवा रुग्णवाहिका पोहोचेपर्यंतची काही मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतात. योग्य वेळी योग्य पद्धतीने केलेले Chest Compressions एखाद्याला जीवनाची दुसरी संधी देऊ शकतात. म्हणूनच — COLS शिका, कारण तुमचे दोन हात एखाद्याचा जीव वाचवू शकतात.”

जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त भूलतज्ज्ञांची भूमिका केवळ ऑपरेशन थिएटरपुरती मर्यादित नसून Emergency Care, Resuscitation, ICU, Pain Management आणि Critical Care अशा अनेक क्षेत्रांत भूलतज्ज्ञ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा संदेशही या उपक्रमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

SAN सदस्यांसाठी सायंकाळी ६ वाजल्यापासून City Symphony Hotel, Nanded येथे विशेष स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये सदस्यांच्या मुलांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, दांडिया, तसेच डॉ. राजेश तगडपल्ले, डॉ. संजय कदम, डॉ. सचिन चांदोलकर आणि नव्याने ISA सदस्यत्व स्वीकारलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने होईल.

“१८ ऑक्टोबरच्या वॉकथॉनमध्ये सहभागी व्हा आणि COLS शिका. आपण आज शिकलेले काही मिनिटांचे जीवनरक्षक कौशल्य उद्या आपल्या कुटुंबातील, मित्राच्या किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीच्याही जीवनासाठी अमूल्य ठरू शकते,” असे आवाहन SAN अध्यक्षा डॉ. संगीता अग्रवाल आणि सचिव डॉ. अविनाश डी. घोडके यांनी नांदेडकरांना केले आहे.

चला, चालूया आरोग्यासाठी… शिकूया जीव वाचवण्यासाठी!

वॉकथॉनमध्ये सहभागी व्हा • COLS शिका • जीवनरक्षक बना

Share

Related posts

नांदेड पोलीसांची धडक कारवाई : ८४ ‘फटाका सायलेंसर’ जप्त, रोड रोलरने नष्ट

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये समाजशास्त्र सत्रारंभ सोहळा संपन्न

Chief Editor

श्री चक्रधर स्वामी हे मानवतेचे प्रेरणास्त्रोत -प्राचार्य डॉ.मा.मा.जाधव

Chief Editor

जलसंधारणाचे अतुलनीय कार्य श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण यांनी केले -प्रा.इंद्रजीत भालेराव

Chief Editor

पुन्हा हवेत महात्मा गांधीजी : डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

यशवंत ‘मध्ये दुग्धशास्त्र विभागाचा इंडक्शन प्रोग्राम संपन्न

Chief Editor

Leave a Comment