सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात देखील अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या भरपूर संधी निर्माण होत आहेत – डॉ. अशोक टिपरसे

नांदेड: डॉ. प्रवीण कुमार सेलूकर
सध्याच्या कालखंड हा माहिती तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखल्या जात आहे या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान दिवसेंदिवस बदलत आहे यामुळे करिअरच्या जुन्या संधी आपोआप पणे कमी होत आहेत.परंतु करिअरच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत.सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डेटा कलेक्शन, बिग डेटा अनालिसिस, डेटा सायंटिस्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बँकिंग फायनान्स, कर सल्लागार , स्टार्ट अप यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या भरपूर संधी निर्माण होत आहेत. या संधीचा लाभ घेण्याकरता अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माजी सिनेट सदस्य तथा मेंबर ऑफ मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य तथा देगलूर महाविद्यालय,देगलूर येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अशोक टिपरसे सर यांनी यशवंत महाविद्यालयातील पदव्युत्तर वर्गासाठी आयोजित करण्यात आलेल्या इंडक्शन प्रोग्राम मध्ये आपले मत व्यक्त केले.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त अर्थशास्त्र विभागाद्वारे आयोजित सत्रारंभ व्याख्यान ‘अर्थशास्त्र विषयातील करिअर संधी’ या विषयावरील व्याख्यानामध्ये ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी भूषविले. विचारमंचावर अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अजय मुठ्ठे, डॉ. दिगंबर भोसले, डॉ. ज्ञानेश्वर पुप्पलवाड, डॉ. आवळे एस.डी. डॉ.पाटील सर, डॉ़.पवार मॅडम,डॉ.प्रवीण सेलूकर, प्रा.राहुल लिंगमपल्ले,प्रा.आकांक्षा भोरे,प्रा.नयना देशमुख इत्यादी अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक याचबरोबर पदव्युत्तर प्रथम आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
धो
पुढे बोलताना प्राध्यापक अशोक टिप्परसे असे म्हणाले की, अर्थशास्त्रामध्ये व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेपूर संधी उपलब्ध असून स्पर्धा परीक्षा, संशोधक, डेटा विश्लेषक, सांख्यिकी, औद्योग आदी विविध क्षेत्रात रोजगार प्राप्त होण्याकरिता अर्थशास्त्रातील अभ्यासक्रम उपयुक्त आहे. एम. ए. चे शिक्षण घेत असतानाच योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. ए .द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी प्रियंका गायकवाड यांनी केले तर आभार आकांक्षा अडकोड या विद्यार्थिनींनी मांडले मानले याचबरोबर निकिता नीता प्रणिता आकांक्षा या विद्यार्थिनींनी आपले मनोगत सादर केले तसेच भोजराज आणि श्रीनाथ या विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत सादर केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एम. ए. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीं परिश्रम घेतले. या व्याख्यानास विद्यार्थी विद्यार्थिनींची बहुसंख्येने उपस्थिती होते.