एम सी आर

*ए बी फॉर्म* चुकीचा निघाल्याने (जोडला ) वंचितच्या उमेदवाराला पक्षापासून वंचित राहणाची पाळी

Uncategorized

*Mcr-news*
*manawat.*
————————————

*मानवत* तालुक्यातील ताडबोरगाव गटात वंचित बहुजन आघाडी कडून अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराने पक्षाचा *ए.बी. फॉर्म* तपासणीत चुकीचा निघाल्याने यूवा उमेदवाराला आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याची पाळी आली आहे.
उमेदवाराला वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी साठी उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मानवत तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार, सहाय्यक निवडणूक अधिकारी पांडुरंग माचेवाड यांच्या उपस्थितीत पार पडली. छाननी दरम्यान ताडबोरगाव गटातून विनोद मकासरे यांनी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र उमेदवाराने पक्षाचा *ए.बी. फॉर्म* ताडबोरगाव *गटा* ऐवजी ताडबोरगाव *गणाचा* जोडला यामुळे विनोद मकासारे हे पक्षाचे अधिकृत उमेदवार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र उमेदवारी अर्ज विहित नमुन्यात भरण्यात आल्याने अर्ज वैध ठरवण्यात आला असल्याने *विनोद मकासरे* यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यां मध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. असे असले तरी *विनोद मकासरे* यांना पक्षाकडून पुरस्कृत केले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान तालुक्यातील उर्वरित तीन गटात वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार रिंगणात असणार आहेत.

***

Share

Related posts

निरोगी जीवनशैलीसाठी मूलभूत आरोग्य टिप्स आरोग्य सल्लागार मीरा धुळगुंडे नांदेड

Chief Editor

परभणीत ‘शंकर गंधम सर स्मृती जिल्हास्तरीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा’ उत्साहात संपन्न

Chief Editor

यशवंत’मधील संशोधक भारत कदम यांना पीएच.डी. प्राप्त

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठाच्या बहिस्थ शिक्षण विभागाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

Chief Editor

माता रमाई महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पॅम्प्लेटचे उत्साहात उद्घाटन

Chief Editor

पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची अंतिम मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढविली

Chief Editor

Leave a Comment