एम सी आर

पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची अंतिम मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढविली

Uncategorized

नांदेड:दि १२ ऑगस्ट 2026
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या विनंतीनुसार प्रथम वर्ष प्रवेशाची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ ऐवजी आता २० ऑगस्ट २०२६ करण्यात आली आहे.
विद्यापीठाने यापूर्वी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शैक्षणिक वेळापत्रक निश्चित केले होते. त्यानुसार प्रथम वर्ष प्रवेशाची अंतिम तारीख १८ जून २०२६ ते २४ जून २०२६ अशी होती. तसेच मार्च २०२६ मध्ये बारावीची पुरवणी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष प्रवेशासाठी ३१ जुलै २०२६ पर्यंत संधी देण्यात आली होती.
मात्र, विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी केलेल्या विनंतीचा विचार करून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी प्रथम वर्ष प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार प्रवेशाची अंतिम तारीख आता २० ऑगस्ट २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.
याबाबत विद्यापीठाच्या शैक्षणिक नियोजन व विकास विभागाने दि.११ ऑगस्ट २०२६ रोजी शुद्धीपत्रक जारी केले असून, सर्व संबंधितांनी सुधारित मुदतीची नोंद घ्यावी, असे विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे.
मुदतवाढीमुळे अद्याप पदवी प्रथम वर्षासाठी प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, संबंधित विद्यार्थ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शैक्षणिक नियोजन व विकास विभागाचे उपकुलसचिव यांनी केले आहे.
——————————

Share

Related posts

घरफोडी प्रकरणातील आरोपी १२ तासांत जेरबंद; १९.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Chief Editor

यशवंत महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राद्वारे यश कार्डचे वाटप

Chief Editor

ज्ञानदानातून वाढदिवस साजरा – एक वेगळी आणि प्रेरणादायी परंपरा!

Chief Editor

कै.‌सौ.‌ कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील वाड्मय मंडळाच्या वतीने कमल वार्षिकांक विमोचन

Chief Editor

नाथ संप्रदायातील एक सहज संत: ह भ प श्री गहिनीनाथ महाराज औसेकर*

Chief Editor

भारताने टी-20 वर्ल्ड कप 2026 जिंकला, ऐतिहासिक विजय! 🇮🇳🏆

Chief Editor

Leave a Comment