https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष मंगेश कदम यांचा काँग्रेसला अखेरचा जय भीम…

नांदेड दिनांक.काँग्रेसचे मागासवर्गीय विभागाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कदम यांच्यासह नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ ज्योती मनीष कदम आणि नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव एडवोकेट धम्मपाल कदम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसला बुधवारी रात्री उशिरा अखेरचा जय भीम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले आहे यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथे वर्षा निवासस्थानी पार पडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात शिवसेनेची पकड अधिक घट्ट होत आहे शहरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी भरघोस नीती उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होण्यासाठी शेकडो कार्यकर्ते लाईन लावून उभे असतात आमदार बालाजी कल्याणकर यांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ सर्व अर्थाने मजबूत करण्यासाठी सपाटा लावला आहे…

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704