एम सी आर

यशवंत ‘मध्ये दुग्धशास्त्र विभागाचा इंडक्शन प्रोग्राम संपन्न

Uncategorized

नांदेड :(दि. १३ ऑगस्ट २०२६)
यशवंत महाविद्यालयात दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दुग्धशास्त्र विषयाची व्याप्ती, आधुनिक तंत्रज्ञान, व्यवसायाच्या संधी तसेच कृषी व दुग्धव्यवसायातील विविध संधींची माहिती मिळावी, हा प्रमुख उद्देश होता.
प्रास्ताविक दुग्धशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजकुमार सोनवणे यांनी केले. त्यांनी विभागाची शैक्षणिक वाटचाल, अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक व व्यावसायिक संधींची माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी डॉ. महेश अंबोरे, कृषी विज्ञान केंद्र, पोखरणी, नांदेड हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, पशुपालन, दुग्ध उत्पादनातील गुणवत्ता आणि कृषीपूरक व्यवसायाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.
तसेच श्री. अशोक वडवळे, रेशीम उद्योग विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांनी विद्यार्थ्यांना रेशीम उद्योगाची माहिती देत कृषी व दुग्धव्यवसायासोबत पूरक व्यवसायाच्या उपलब्ध संधींबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागातील प्रा. बाळासाहेब लांडगे यांनी सहकार्य केले व उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचे सांगता केली. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्री. ए. बी. शिंगेवाड यांनी विशेष मेहनत घेतली.
या इंडक्शन प्रोग्राममुळे विद्यार्थ्यांना दुग्धशास्त्र विषयाच्या व्यापक संधींची तसेच भविष्यातील करिअरच्या विविध पर्यायांची उपयुक्त माहिती मिळाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.

Share

Related posts

मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात सुरू *(परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता पथक कार्यरत

Chief Editor

विद्यापीठ आणि मनपा यांच्या समन्वयाने शहराचा कायापालट करता येईल– कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांचे आवाहन

Chief Editor

विद्यार्थीप्रिय आदर्श प्राध्यापक: प्रा. डॉ. वसंत गुरव :

Chief Editor

यशवंत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील वाहतूक कोंडीचा प्रश्न; पोलिसांकडे वाहतूक नियमनाची मागणी

Chief Editor

विकास, गुंतवणूक व रोजगार निर्मितीला चालना देणारा अर्थसंकल्प: आरिफ खान

Chief Editor

नांदेड जिल्ह्याचा किकबॉक्सिंगमध्ये दबदबा; २३ खेळाडू राज्यस्तरासाठी पात्र

Chief Editor

Leave a Comment