एम सी आर
Uncategorized

मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात सुरू *(परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता पथक कार्यरत

नांदेड :

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या हिवाळी २०२६ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेला दि. ७ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून या परीक्षा नांदेड विभागीय केंद्राअंतर्गत नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणात पार पडत असल्याची माहिती नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कलेपवार यांनी दिली.
मुक्त विद्यापीठाच्या या परीक्षा दि. ७ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहेत. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नांदेड विभागात एकूण २३,२३४ परीक्षार्थी परीक्षा देत असून चारही जिल्ह्यांतील ३५ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येत आहे.
परीक्षा कॉपीमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडाव्यात, यासाठी नांदेड विभागीय केंद्राच्या वतीने परीक्षा केंद्रावर एकूण ३५ बहिस्थ पर्यवेक्षक( बैठे पथक) तसेच ७ दक्षता पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या दक्षता पथकांमध्ये अनुभवी प्राध्यापकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सर्व परीक्षा केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना विद्यापीठाच्या वतीने विनंती पत्र देण्यात आले आहे.
सर्व ३५ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत परीक्षा पार पडत असून आतापर्यंत दक्षता पथकाच्या तपासणीत गैरप्रकार करणाऱ्या ८३ विद्यार्थ्यांवर कार्यवाही करण्यात आल्याचेही डॉ. कलेपवार यांनी सांगितले.

दिनांक ११,१४,१५,१६ रोजीच्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल
दि. ११ जानेवारी रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तसेच दि. १४, १५ व १६ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षा सार्वत्रिक
महानगरपालिका निवडणूक आणि मतमोजणी असल्याने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सदरील पेपर विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार दि. २२, २३, २४ व २५ जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कलेपवार यांनी दिली.

Share

Related posts

आर्यनचे जीवन क्षेत्र पुनर्संचयित करणाऱ्या प्रकल्पावर संशोधन

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ‘अमृत कौशल्य उद्यम विकास योजना’अंतर्गत* *मोफत कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

Chief Editor

२२ जानेवारी रोजी कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयात बोलींचा जागर कार्यक्रमाचे आयोजन.

Chief Editor

हिंद दी चादर’ या भव्य समागमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी दोन दिवस उल्लेखनीय सेवाकार्य केले.

Chief Editor

महापालिका नांदेडच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात शहरातील अपघातांना आळा घालण्यासाठी गतिरोधक बसवण्याचा समावेश करावा

Chief Editor

यशवंत’मधील संशोधक भारत कदम यांना पीएच.डी. प्राप्त

Chief Editor

Leave a Comment