एम सी आर
Uncategorized

आरआरसी प्रस्ताव सादर करण्याची मुदत वाढविण्याची: डॉ. महेश मगर यांची मागणी

नांदेड, दि. २ जून : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संशोधन व मान्यता समिती (RRC) संदर्भातील विविध प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ५ जून २०२६ वरून २० जून २०२६ पर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. या बाबत डॉ. महेश मगर यांनी कुलगुरूंना ई-मेलद्वारे निवेदन पाठविले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठाने १ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार संशोधन आराखडा, अंतिम संशोधन सारांश, विषय बदल प्रस्ताव, सहमार्गदर्शक नियुक्ती आदी प्रस्ताव सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ चार दिवसांचा कालावधी मिळाला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक मार्गदर्शक मुख्यालयाबाहेर असल्याने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे विद्यार्थ्यांसाठी कठीण होत आहे. त्यामुळे अनेक संशोधक विद्यार्थी आरआरसी प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

विद्यापीठ परिसरातील विविध संशोधन केंद्रांमधून मुदतवाढीची मागणी होत असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अंतिम मुदत २० जूनपर्यंत वाढवावी, तसेच त्याबाबत सुधारित परिपत्रक तातडीने प्रसिद्ध करावे, अशी मागणी डॉ. महेश मगर यांनी केली आहे.

Share

Related posts

नांदेडमध्ये घरफोडी प्रकरणाचा छडा तीन आरोपी अटकेत • रोख रक्कम जप्त

Chief Editor

पत्रकार क्षेत्रातील कार्याबद्दल परवीन शेख खलील यांना ‘मुकनायक नॅशनल अवॉर्ड – 2026’ जाहीर

Chief Editor

महादेव पिंपळगाव येथे अति आवश्यक संच वितरण कॅम्पमध्ये गोंधळ; बांधकाम कामगारांची गैरसोय

Chief Editor

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा;

Chief Editor

यशवंत महाविद्यालयात अभिरुची फिल्म क्लबच्या वतीने ‘दिठी’ चित्रपटाचा आस्वाद

Chief Editor

यशवंत ‘ मधील डॉ.मीरा फड यांची राज्यस्तरीय निवड

Chief Editor

Leave a Comment