एम सी आर
Uncategorized

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त मसापच्या वतीने आज कवी संमेलन आणि साहित्यिकांचा गौरव

नांदेड : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखा नांदेडच्या वतीने कवी संमेलन आणि पुरस्कार प्राप्त मान्यवर साहित्यिकांचा गौरव आज दिनांक 31 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता हॉटेल विसावा पॅलेस येथे आयोजित करण्यात आला आहे.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीने महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी आयोजित मालिकांमधील हा दुसरा कार्यक्रम आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक गणेशराज सोनाळे , ज्येष्ठ कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या हस्ते मान्यवर साहित्यिकांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य जेष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी , ज्येष्ठ साहित्यिक मनोज बोरगावकर , ज्येष्ठ कवी डॉ. पी.विठ्ठल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम तरटे हे करणार असून त्यानंतर ज्येष्ठ कवी शिवाजी आंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘कविता क्रांती’च्या या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन श्रीनिवास मस्के करणार असून या कवी संमेलनात नांदेड शहर आणि जिल्ह्यातील मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. आयोजित कवी संमेलन आणि पुरस्कार प्राप्त मान्यवर साहित्यिकांच्या गौरव सोहळ्यास साहित्यिक, साहित्यप्रेमी आणि वाचकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मसाप शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबितदार , उपाध्यक्ष दिगंबर कदम, उपाध्यक्ष श्रीनिवास मस्के , कार्यवाह प्रा. महेश मोरे , सहकार्यवाह राम तरटे, कोषाध्यक्ष व्यंकटेश चौधरी यांच्यासह सन्माननीय कार्यकारणी सदस्य प्रा. संजय जगताप, व्यंकटेश काटकर, डॉ. योगिनी सातारकर , सौ अनुजा डोईफोडे, सौ.ललिता शिंदे, शेख निजाम गवंडगावकर , प्रा. धाराशिव शिराळे, एड. विजयकुमार भोपी, एड. गजानन पिंपरखेडे यांनी केले आहे.

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये वाणिज्य व व्यवस्थापनातील विविध अभ्यास मंडळाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

Chief Editor

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनास उत्स्फूर्त सुरुवात

Chief Editor

निरोगी जीवनाचा मंत्र : योग

Chief Editor

नेसुबो महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी निवड

Chief Editor

व्यायाम करणे म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी एक महत्त्वाचा उपाय आहे.:मीरा धुंळगुडे

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात छायाचित्रकार विजय होकर्णे निर्मित* *‘गोदाकाठचा महान कर्मयोगी’ माहितीपटाचे प्रदर्शन*

Chief Editor

Leave a Comment