एम सी आर
Uncategorized

नांदेड पोलीसांची धडक कारवाई : ८४ ‘फटाका सायलेंसर’ जप्त, रोड रोलरने नष्ट

नांदेड, दि. २४ मार्च २०२६ — शहरात काही दुचाकी चालकांकडून अनधिकृतरीत्या बदल केलेले ‘फटाका सायलेंसर’ बसवून मोठ्या आवाजात हुल्लडबाजी केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नांदेड पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करत विशेष मोहीम राबवली.

या मोहिमेदरम्यान एकूण ८४ मोटरसायकलींवर कंपनीने मान्य न केलेले सायलेंसर आढळून आले. संबंधित वाहनांची तपासणी करून हे सर्व ८४ सायलेंसर जप्त करण्यात आले असून वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

जप्त केलेले सायलेंसर मंगळवारी (दि. २४ मार्च) सायंकाळी ४.०० ते ४.३० या वेळेत महावीर चौक, नांदेड येथे रोड रोलरच्या साहाय्याने नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे शहरातील ध्वनीप्रदूषणावर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहनांमध्ये केवळ कंपनीने दिलेल्या मानकांनुसारच सायलेंसर वापरावेत व कायद्याचे पालन करावे. अनधिकृत सायलेंसर वापरणाऱ्यांविरोधात पुढेही सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

ही मोहीम पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजन, श्याम पानेगांवकर, तसेच स्थानिक गुन्हे शाखा व शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Share

Related posts

अतिक्रमणाविरोधात संयुक्त कारवाई; शिवाजीनगरसह इतर परिसरातील रस्ते व फुटपाथ मोकळे

Chief Editor

लोकमत नांदेड गौरव सोहळा २०२६ : आरोग्यसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. अर्जुन शेळके यांचा सन्मान

Chief Editor

अर्थशास्त्रातील करिअर संधीवर प्राध्यापक सागर कोंडेकर यांचे मार्गदर्शन कौशल्य विकासावर भर देण्याचे आवाहन

Chief Editor

विचारांची आणि मनाची स्वातंत्रता हीच खरी लोकशाही- प्रा डॉ सुधीर गव्हाणे

Chief Editor

महादेव पिंपळगाव येथे अति आवश्यक संच वितरण कॅम्पमध्ये गोंधळ; बांधकाम कामगारांची गैरसोय

Chief Editor

प्रो. राजाराम माने यांच्या संशोधन टीमच्या ‘विषारी वायू शोधक’ उपकरणाला केंद्र सरकारचे पेटंट

Chief Editor

Leave a Comment