ताज्या बातम्या

केकरजवळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत अनिवासी हंगामी वस्तीग्रहाचे उद्घाटन

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. केकर जवळा येथे दिनांक १९ नोव्हेंबर रोजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोकराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२२ -२०२३ च्या अनिवासी हंगामी वसतीग्रहाचे उद्घाटन करण्यात आले.
स्थलांतरीत पालकांच्या पाल्याना शिक्षण घेता यावे म्हणून शासनाने हंगामी वस्ती गृहाची व्यवस्था केली आहे.
याच अनुषंगाने मानवत तालूक्यातील केकरजवळा येथे ही हंगामी वस्ती गृह सुरु करण्यात आले असून. या हंगामी वस्तीगृहा चे उदघाटन करण्यात आले. या वेळी कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष हनुमान कौसाले, विलासराव पंडित मानवी हक्क अभियानाचे ज्येष्ठ नेते तथा पत्रकार रघुनाथदादा कसबे, मानवी हक्क अभियानचे भीमाशंकर वैराळे, चंद्रकांत गवारे, ग्रा.स.गणेशराव लाडाने, अनिवासी हंगामी वस्तीग्रहाचे अधीक्षक अजय हिवाळे, शाळेचे मुख्याध्यापक श्री.के .एस. लहिरे, पी. आर. आतकरे, सुरेश गिरी, भालचंद्र जाधव, मारुती गव्हाणे उत्तमराव खिल्लारे, साहेबराव गोरे, संदिपान हरगुडे, सागर जाधव, विशाल कोल्हे, श्रीमती जगताप श्रीमती सुरेवाड यांच्या सह या वेळी शिक्षक बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उत्तम खिल्लारे यांनी केले तर, या वेळी सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन श्री.पी आर. आतकरे यांनी मानले.

**

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button