एम सी आर
Uncategorized

विद्यार्थ्यांनी आयुष्याच्या परीक्षेमध्ये पास व्हावे- तानाजी भोसले

नांदेड: (दि.१७ मार्च २०२६)-
विद्यार्थ्यांनी पुस्तकातील ज्ञान घेण्याबरोबरच आयुष्यातील ज्ञान वेचून आपले अनुभव समृद्ध करून आयुष्याच्या परीक्षेमध्ये पास व्हावे, असे विचार यशवंत महाविद्यालयात आयोजित साहित्य महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये माजी गट शिक्षणाधिकारी तानाजी भोसले यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू आणि यशवंत महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू या विषयाच्या वतीने साहित्य महोत्सव: २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध व काव्य स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे यांनी भूषविले तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, मराठी विभागप्रमुख व समन्वयक डॉ. संजय जगताप यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना तानाजी भोसले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी पुस्तकांना आपला खरा खुरा मित्र मानले पाहिजे. पुस्तकांना अधिक वेळ देताना आयुष्याचे विविध अनुभव जमा करून आयुष्याला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी चुकीच्या बाबींचा त्याग करून चांगली मूल्ये स्वीकारली पाहिजे, व उत्तम व्यवहार सुद्धा शिकला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
निबंध व काव्य स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ग्रंथ वाटप करण्यात आले. यावेळी उर्दू विभागप्रमुख डॉ. शबाना दुर्राणी, हिंदी विभागप्रमुख डॉ. संदीप पाईकराव, इतिहास विभागप्रमुख डॉ. शिवराज बोकडे, डॉ. संगीता शिंदे(ढेंगळे), राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, डॉ. बालाजी भोसले, डॉ. साईनाथ बिंदगे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ. शिवाजी सूर्यवंशी यांनी केले व शेवटी आभार डॉ. संदीप पाईकराव यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share

Related posts

अण्णा भाऊ साठे आणि शंकर भाऊ साठे यांचा समृद्ध वारसा पुढे चालू ठेवणारे खंबीर नेतृत्व : सचिन भाऊ साठे..

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठात नेट-सेट-गेट मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन

Chief Editor

प्राणीशास्त्र हे जैवविविधता आणि पर्यावरणाचा भक्कम पाया – डॉ. रणजितसिंग निंबाळकर

Chief Editor

फुले-शाहू-आंबेडकर विचारांवर ‘शताब्दी २०२६’ अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

नितीन गायकवाड यांची अमरावती विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती

Chief Editor

ने.सु.बो चा एनसीसी कॅडेट गणेश पिसाळ यांची सी.आर. पी.एफ मध्ये निवड

Chief Editor

Leave a Comment