एम सी आर

स्वारातीम विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थी हिताला प्राधान्य: एमएच-सीईटीमुळे हुकलेल्या परीक्षा पुन्हा घेणार

Uncategorized

नांदेड: (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर)

‌स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत उन्हाळी २०२६ सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमातील काही विषयाच्या परीक्षा आणि एमएच-सीईटी परीक्षा एकाच दिवशी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे.
विद्यार्थी तसेच विविध विद्यार्थी संघटनांच्या मागण्यांची दखल घेत परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या दि.०२ एप्रिल, २०२६ रोजी पार पडलेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण परीक्षा पुढे ढकलल्यास अंतिम वर्षाच्या निकालात विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन, ज्या विद्यार्थ्यांच्या एमएच-सीईटी आणि विद्यापीठाच्या परीक्षा एकाच दिवशी आहेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित विद्यार्थ्यांनी एमएच-सीईटी परीक्षा नियोजित वेळेत देऊन, नंतर आपले एमएच-सीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र व उपस्थिती अहवाल महाविद्यालयांच्या प्रचार्यांमार्फत दि.१८ एप्रिल, २०२६ पर्यंत विद्यापीठात सादर करणे आवश्यक आहे.
पुराव्यांची पडताळणी झाल्यानंतर विशेष परीक्षा विद्यापीठ मुख्य परीसर, नांदेड, उपकेंद्र लातूर, परभणी व न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथील निश्चित केंद्रांवर घेण्यात येणार आहेत. दरम्यान, सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, महाविद्यालयांनी ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन विद्यापीठातर्फे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी केले आहे.
———————-

Share

Related posts

रुपाली चाकणकर यांच्या हस्ते कमलोत्सवाचे उदघाटन संपन्न.

Chief Editor

आनंदा वैदिक मॅथ अकॅडमीचे राज्यस्तरीय सुयश

Chief Editor

अभ्यासू, सुसंस्कृत आणि मूल्यनिष्ठ राजकारणी : श्री डी. पी. सावंत

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा; सात दिवसीय योग शिबिराची सांगता

Chief Editor

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालया मध्ये शिवणकाम व ब्यूटीपार्लर कार्यशाळे चा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला

Chief Editor

ज्योतिरादित्या मुठ्ठे ची राज्यस्तरीय किंकबॉक्सिंग स्पर्धेत दोन रौप्य पदकांना गवसंनी

Chief Editor

Leave a Comment