एम सी आर
Uncategorized

रुपाली चाकणकर यांच्या हस्ते कमलोत्सवाचे उदघाटन संपन्न.

परभणी:

स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय बाण्यातून नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेला उज्वल परंपरा असून इथे अनेक विद्यार्थी सुंदर करिअर करू शकले.कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय हे उपक्रमशील महाविद्यालय आहे. परभणी जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणासाठी सुरू करण्यात आलेले हे महाविद्यालय सुजाण संचालक मंडळाच्या मार्गदर्शना खाली प्रगतीपथावर आहे. या महाविद्यालयाने बी.ए ,बी.कॉम या पारंपरिक अभ्यासक्रमा सोबतच बीसीए,बी.व्होक,
एम.व्होक सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर शिक्षण सुरू करत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना कौशल्य विकासा बरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.आज स्त्री शिक्षणा सह स्वालंबन आणि महिला
सक्षमीकरणा सह जीवनाच्या विविध क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या विद्यार्थिनींचं भविष्य उज्वल असल्याची खात्री इथं पटली. महाविद्यालयाने अभ्यासा बरोबरच अभ्यासेत्तर उपक्रमातून विकसित होत विद्यार्थीनी आत्मनिर्भर होण्यासाठी ची संधी निर्माण करुन दिली असल्याची खात्री पटली ,असे मत कमलोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त करत विद्यार्थिनींनी अधिक आत्मविश्वासानं विकसित होत सुजाण समाज घडवावा असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले.

नूतन विद्यामंदिर
शिक्षण संस्था संचलित कै.सौ .कमलताई जामकर
महिला महाविद्यालय परभणी सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कमलोत्सव- २०२६ चे फॅशन शो व वार्षिक स्नेह संमेलन उदघाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हेमंतराव जामकर ( अध्यक्ष, नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था , परभणी ) उदघाटक रूपाली चाकणकर (अध्यक्ष, राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई ) तर प्रमुख अतिथी संचालक ॲड.बाळासाहेब जामकर ,ॲड.मंगेशराव सुभेदार, सचिव विजयराव जामकर , प्राचार्य डॉ.रामचंद्र भिसे.सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.रवींद्र इंगळे यांची उपस्थिती लाभली.
मान्यवरांचे हस्ते कै.कमलताई जामकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले.
हेमंतराव जामकर यांचे हस्ते रुपाली चाकणकर यांचा सत्कार करण्यात आला.प्राचार्य डॉ.रामचंद्र भिसे यांनी मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.अरुण पडघन यांनी केले.

Share

Related posts

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे व्याख्यान संपन्न

Chief Editor

स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील क्रीडा महोत्सव-2026 ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ‘स्पोर्ट्स फिटनेस समर कॅम्प २०२६’चे आयोजन

Chief Editor

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान व असमान निधी योजनांसाठी २१ ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव करण्याचे आवाहन

Chief Editor

यशवंत ‘युवकांचा .डी.पी. सावंत यांच्या उपस्थितीत द्विमार्गी ऑनलाईन संवाद

Chief Editor

आदर्श उपक्रम: सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा** *विविध ठिकाणी वृक्षारोपण; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप

Chief Editor

Leave a Comment