एम सी आर
Uncategorized

ज्योतिरादित्या मुठ्ठे ची राज्यस्तरीय किंकबॉक्सिंग स्पर्धेत दोन रौप्य पदकांना गवसंनी

पुणे (प्रतिनिधी)
पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये ब्लेज कॉम्बॅक्ट अकॅडमी चा खेळाडू आणि नांदेड येथील ग्यानमाता शाळेचा गुणी विद्यार्थी ज्योतिरादित्या मुठ्ठे याने घवघवीत यश मिळवले. ज्योतीरादित्य याने किक बॉक्सिंग खेळातील पॉईंट फाईट आणि लाईट कॉन्टॅक्ट या दोन्ही प्रकारांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आक्रमक खेळी करत दोन रोप्य पदक प्राप्त करत आपल्या खेळाची चुणूक दाखवून दिली.

त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करत हे यश संपादित केले. ज्योतिरादित्य हा अतिशय गुणी विद्यार्थी असून त्याने सुरुवातीपासूनच शैक्षणिक क्षेत्रामध्येही आपले वर्चस्व कायम राखत किक बॉक्सिंग क्रीडा प्रकारातही अल्पावधीमध्ये चांगले कौशल्य प्राप्त केले आणि प्रतिष्ठित अशा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत पॉईंट फाईट आणि लाईट कॉन्टॅक्ट या किक बॉक्सिंग खेळ प्रकारात दोन रोप्य पदकावरती आपली मोहर उमटवली. ज्योतिरादित्यचे यश म्हणजे नांदेड जिल्हाकरिता खरोखरच अभिमानाची बाब ठरली आहे.

तो नांदेड येथील ब्लेझ कॉम्बॅक्ट अकादमीचा विद्यार्थी असून त्याने अकॅडमी चे संचालक श्री किरण सर, तसेच प्रशिक्षका दीपा गवळी मॅडम, आणि प्रशिक्षक गणेश सर यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली सदरील स्पर्धेची तयारी केली. यापूर्वी नुकत्याच पार पडलेल्या नांदेड जिल्हास्तरीय वरील दोन्ही किकबॉक्सिंग स्पर्धां प्रकारामध्ये त्याने दोन सुवर्णपदके प्राप्त केलेली आहेत. जिद्द, चिकाटी, नियमित सराव आणि सातत्य या गुणाच्या जोरावर त्याने आपले हे सुयश संपादन केले आहे. ज्योतिरादित्य हा यशवंत महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. अजय मुठ्ठे यांचा तो मुलगा आहे. ज्योतिरादित्त्य याची इंदौर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठीही निवड झाली आहे. सदरील यशासाठी ब्लेज कॉम्बॅक्ट अकॅडमी तसेच त्याच्या शाळेचे शिक्षक, पालक, मित्रपरिवार, नातेवाईक आणि समाजातील सर्व स्तरातून त्याचे खुप कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

Share

Related posts

नियमांच्या चौकटीत माणुसकी जपणारा अधिकारी शेख सिकंदर अली

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठाच्या बहिस्थ शिक्षण विभागाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

Chief Editor

यशवंत मध्ये “भारत एन्व्हायरमेंट प्रोग्राम सप्ताहाचे” आयोजन

Chief Editor

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा;

Chief Editor

स्वा.रा.ती.म. विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रात ‘डेव्हलपमेंट स्टडीज’ पदविका अभ्यासक्रम सुरू – डॉ. महेश मगर

Chief Editor

कल्चरल’ची फुले–शाहू–आंबेडकर–अण्णा भाऊ साठे व्याख्यानमाला १० व ११ जानेवारीला* पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, कॉ. किरण मोघे गुंफणार पुष्प

Chief Editor

Leave a Comment