एम सी आर
Uncategorized

स्वावलंबनाचा आदर्श आणि मानवतेला साथ : बीह्युमन्स वेल्फेअर फाउंडेशनच्या पहिल्या देणगीदार दाम्पत्याचा नातवाच्या हस्ते सन्मा

संस्थेच्या पहिल्या देणगीदारांना ‘ह्युमॅनिटी सपोर्टर’ मानपत्र प्रदान; श्री. व सौ. पुष्पाबाई गंगाधरराव बिडकर दाम्पत्याच्या प्रेरणादायी कार्याचा गौरवदेगलूर प्रतिनिधी : समाजात अनेक व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आयुष्यभर कष्ट करतात. मात्र स्वतःच्या गरजा आणि अडचणी बाजूला ठेवून आपल्या मुलांच्या व नातवंडांच्या स्वप्नांना बळ देणारे पालक समाजासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान ठरतात. अशाच एका स्वावलंबी आणि आदर्श दाम्पत्याचा सन्मान आज देगलूर येथे बीह्युमन्स वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला.श्री. गंगाधरराव बिडकर व सौ. पुष्पाबाई गंगाधरराव बिडकर यांनी आपल्या स्वावलंबी जीवनाचा आदर्श जपत, आपल्या मुलाच्या सामाजिक कार्याच्या स्वप्नाला बळ देण्यासाठी पुढे केलेल्या मदतीच्या हाताचा गौरव यावेळी करण्यात आला. विशेष म्हणजे, बीह्युमन्स वेल्फेअर फाउंडेशनच्या सामाजिक कार्याच्या प्रवासातील हे दाम्पत्य पहिले देणगीदार ठरले आहे.बीह्युमन्स वेल्फेअर फाउंडेशनची स्थापना झाल्यानंतर संस्थेच्या विविध प्रशासकीय व सामाजिक कार्याला सुरुवात झाली. मात्र संस्थेचे बँक खाते सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असताना या दाम्पत्याने आपल्या मुलाच्या सामाजिक कार्याच्या संकल्पनेवर विश्वास ठेवत मदतीचा हात पुढे केला.श्री. व सौ. पुष्पाबाई गंगाधरराव बिडकर यांनी संस्थेसाठी ११ हजार रुपयांची देणगी दिली. या देणगीतूनच संस्थेचे बँक खाते सुरू करण्याच्या कार्याला आधार मिळाला. त्यामुळे या योगदानाला बीह्युमन्स वेल्फेअर फाउंडेशनच्या इतिहासात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.मागील अनेक दिवसांपासून या पहिल्या देणगीदार दाम्पत्याचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा आणि स्वावलंबी जीवनाचा आदर्श समाजापुढे मांडण्याची इच्छा होती. अखेर आज देगलूर येथे हा भावनिक आणि प्रेरणादायी क्षण साकार झाला.विशेष म्हणजे, या दाम्पत्याचा सन्मान त्यांच्या स्वतःच्या नातवाच्या हस्ते करण्यात आला. बीह्युमन्स वेल्फेअर फाउंडेशनचे सेकंड डायरेक्टर गौरव गजानन बिडकर यांच्या हस्ते श्री. व सौ. बिडकर दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या सामाजिक कार्याला आणि संस्थेवरील विश्वासाला सलाम म्हणून त्यांना ‘ह्युमॅनिटी सपोर्टर’ हे मानाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.या प्रसंगी कुटुंबातील तीन पिढ्यांचा एक प्रेरणादायी संगम पाहायला मिळाला. संस्थेच्या फर्स्ट डायरेक्टर माधुरी गजानन बिडकर या या देणगीदार दाम्पत्याच्या सून असून, सेकंड डायरेक्टर गौरव गजानन बिडकर हे त्यांचे नातू आहेत. तर बीह्युमन्स वेल्फेअर फाउंडेशनचे फाउंडर तथा सीईओ गजानन गंगाधरराव बिडकर हे या आदर्श दाम्पत्याचे सुपुत्र आहेत.आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या काळातही श्री. व सौ. बिडकर दाम्पत्याने आजवर स्वावलंबी जीवन जगत आपला आदर्श कायम ठेवला आहे. स्वतःच्या कष्टावर जीवन जगतानाच आपल्या मुलाच्या आणि नातवाच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन आणि मदतीचा हात पुढे केला.बीह्युमन्स वेल्फेअर फाउंडेशनच्या सामाजिक कार्याच्या प्रवासात त्यांची ११ हजार रुपयांची देणगी केवळ आर्थिक मदत नसून, ती एका सामाजिक स्वप्नावर ठेवलेला विश्वास असल्यची भावना यावेळी व्यक्त करण्यात आलीआई-वडिलांनी मुलाच्या स्वप्नावर विश्वास ठेवून केलेली मदत आणि त्याच आई-वडिलांचा नातवाच्या हस्ते झालेला सन्मान हा क्षण केवळ एका कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. कुटुंबातील एकमेकांप्रती असलेला विश्वास, सामाजिक कार्याला दिलेली साथ आणि पुढील पिढीच्या स्वप्नांना दिलेले बळ यामुळे श्री. व सौ. पुष्पाबाई गंगाधरराव बिडकर दाम्पत्याने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या या प्रेरणादायी योगदानाबद्दल विविध स्तरांमधून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. बीह्युमन्स वेल्फेअर फाउंडेशनच्या सामाजिक कार्याच्या पुढील वाटचालीसाठी या पहिल्या देणगीदारांनी दिलेला विश्वास आणि आशीर्वाद कायम प्रेरणादायी ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Share

Related posts

मौजे दरेगाव येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी…

Chief Editor

पुस्तकप्रेमाकडून पुस्तक वेडाकडे नेणारा उपक्रम: यशवंत बिब्लियोफाइल्स!

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात छायाचित्रकार विजय होकर्णे निर्मित* *‘गोदाकाठचा महान कर्मयोगी’ माहितीपटाचे प्रदर्शन*

Chief Editor

भगवान रजनीश संबोधी दिनी सक्रिय ध्यान अभियान समारोप सोहळा

Chief Editor

सामाजिक माध्यमे आणि समाज’ पुस्तक प्रकाशित समाजशास्त्र विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ग्रंथ

Chief Editor

पद्मश्री डॉ.स्मिता रविंद्र कोल्हे यांना सन २०२४- २५ या वर्षीचा कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार जाहीर.

Chief Editor

Leave a Comment