एम सी आर

स्वारातीम विद्यापीठाच्या ‘ज्ञानतीर्थ–२०२६’युवक महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ! कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजवंदन; महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करीत भव्य शोभायात्रा

Uncategorized
स्वारातीम विद्यापीठाच्या ‘ज्ञानतीर्थ–२०२६’युवक महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ!
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजवंदन;
महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करीत भव्य शोभायात्रा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन ‘ज्ञानतीर्थ–२०२६’ युवक महोत्सवाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. सायन्स कॉलेज येथील ‘महात्मा फुले नगरी’मध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करून महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत, महाराष्ट्र राज्यगीत आणि विद्यापीठ गीताच्या सामूहिक गायनाने संपूर्ण परिसरात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
ध्वजवंदनानंतर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून सायन्स कॉलेजपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले: एक थोर समाजसुधारक’ या संकल्पनेवर आधारित शोभायात्रेतून महात्मा फुले यांच्या सामाजिक समता, शिक्षण आणि समाजप्रबोधनाच्या विचारांचा जागर करण्यात आला. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी कलावंतांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शोभायात्रेला विशेष रंगत प्राप्त झाली.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे यांच्यासह विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद तसेच आधीसभेचे सन्माननीय सदस्य, संघव्यवस्थापक, प्राध्यापक आणि विद्यार्थी कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या युवक महोत्सवाच्या प्रारंभाने सायन्स कॉलेज परिसरात सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Share

Related posts

अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी आत्महत्या हा पर्याय नाही; मदत मागा, आयुष्याला नवी दिशा द्या

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठ व जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट एआय-सारथी’ प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ

Chief Editor

नांदेडमध्ये भरदिवसा खून; इंदिरानगर परिसरात खळबळ

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

संत शिरोमणी गोरोबा काकांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये २ ऑगस्टला भव्य शोभायात्रा, विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण सत्कार सोहळा

Chief Editor

धनगरवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक युवक शिबिराचे दिमाखदार उद्घाटन

Chief Editor

Leave a Comment