एम सी आर

यशवंत ‘ मधील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे जलतरणामध्ये राज्यस्तरीय सुयश

Uncategorized

नांदेड:( दि. १३ ऑक्टोबर २०२६)
यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील सुप्रसिद्ध जलतरणपटू व समाजशास्त्र विषयाचे प्रा. ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांना महाराष्ट्र राज्य वेटरन्स एक्वेटिक असोसिएशनतर्फे आयोजित २७ व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत चार पदकांची प्राप्ती झाली आहे. मिडले रिलेमध्ये सुवर्ण, फ्री रिलेमध्ये रौप्य आणि १०० मीटर आणि ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये कांस्य पदके अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत पटकावली आहेत.
एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत प्राप्त केलेल्या या सुयशाबद्दल माजी प्र-कुलगुरू व विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी प्रा. गुंजकर यांचा यथोचित सत्कार केला व भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अजय गव्हाणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. नरेंद्र कंचटवार, लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर यांची उपस्थिती होती.
या सुयशाबद्दल कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. वंदना बदने, डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, डॉ. कविता सोनकांबळे, डॉ.मीरा फड, प्रा. सुभाष बोखारे, प्रा. एस. एम. कुलकर्णी, डॉ. बी. जी. देशमुख, डॉ. एकनाथ मिरकुटे, डॉ. वीरभद्र स्वामी, डॉ. विश्वाधार देशमुख, डॉ. एम.एम.व्ही.बेग, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक गजानन पाटील व प्रकाश शिंदे, जगन्नाथ महामुने, खंडू देशमुख, डॉ. सुनील बासटवार, प्रा. अभिनंदन इंगोले, डॉ.मुकुंद कवडे, सेवानिवृत्त वनाधिकारी गोपाळराव गुंजकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक किशोर गुंजकर, श्रीकांत गुंजकर यांनी अभिनंदन केले आहे.

Share

Related posts

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘युवा कट्टा’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

Chief Editor

उपवर्गीकरणाचा तिढा सोडवण्यासाठी ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा – सुरेशदादा गायकवाड

Chief Editor

राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण

Chief Editor

मालेगावात दिवसाढवळ्या चोरी; शिवशक्ती ज्वेलर्स मालकाची बॅग लंपास

Chief Editor

यशवंत ‘चे जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश

Chief Editor

अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी नांदेडमध्ये मातंग समाजाचा विराट जनआक्रोश महामोर्चा.

Chief Editor

Leave a Comment