एम सी आर

यशवंत ‘चे जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश

Uncategorized

नांदेड, दि. ४ ऑगस्ट २०२६:
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत उपक्रमांतर्गत ‘नशामुक्त युवा – विकसित भारत अभियान’ अंतर्गत जिल्हा युवा अधिकारी कार्यालय, नांदेड व राष्ट्रीय सेवा योजना विभाग, यशवंत महाविद्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये यशवंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
महाविद्यालयातील एकूण १३७ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये नावनोंदणी करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यापैकी विद्यार्थ्यांनी ५ सुवर्ण, ४ रौप्य व ६ कांस्य पदके तसेच प्रमाणपत्रे मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
माजी प्र-कुलगुरू तथा प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले गेले. विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरावर महाविद्यालयाचे नाव लौकिक केले.
स्पर्धांमध्ये काव्यवाचन (स्लॅम पोएट्री) या प्रकारात विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांसह प्रमाणपत्रे पटकावली. रील व लघुपट निर्मिती स्पर्धेतही सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके मिळवून विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेचा ठसा उमटविला. नुक्कड नाटक (पथनाट्य) या प्रकारात सुवर्ण व कांस्य पदक, नृत्य स्पर्धेत रौप्य पदक, वकृत्व/वादविवाद स्पर्धेत रौप्य व कांस्य पदके, चित्रकला स्पर्धेत सुवर्ण व कांस्य पदके, तर संगीत स्पर्धेत सुवर्ण व कांस्य पदके मिळवले. यशवंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ५ सुवर्ण, ४ रौप्य व ६ कांस्य पदक मिळवत विविध कलाक्षेत्रांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले.
दि. एक ऑगस्ट रोजी यशवंत महाविद्यालयामध्ये संपन्न झालेल्या या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती, सामाजिक जागरूकता आणि विकसित भारत या संकल्पनांवर आधारित विविध कलाप्रकारांतून प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी कार्य केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल मा. श्री. डी. पी. सावंत (माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा सचिव, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेड), डॉ. रत्नदीप गायकवाड (अपर जिल्हाधिकारी, नांदेड), श्री अशनी कानकटे (माय भारत, जिल्हा युवा अधिकारी, नांदेड), समाजसेवक श्री कैलास गायकवाड तसेच विविध मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
यशस्वीत्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. साईनाथ बिंदगे, डॉ. शिवाजी सूर्यवंशी, डॉ. रत्नमाला म्हस्के, संगीत विभागप्रमुख डॉ.शिवदास शिंदे, डॉ. संगीता चाटी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच प्रा. अभिनंदन इंगोले, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार, गजानन पाटील यांनी यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

Share

Related posts

विद्यार्थ्यांनी आयुष्याच्या परीक्षेमध्ये पास व्हावे- तानाजी भोसले

Chief Editor

पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना कै. सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार प्रदान

Chief Editor

डॉ.अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवाद आणि संविधानवादाचे सुरेख मिश्रण -डॉ. बी. एस. वाघमारे

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

यशवंत इमॅजिनेशिया : उत्सव कलांचा!’ कला प्रदर्शन उत्साहात संपन्न

Chief Editor

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची प्रदेश कार्यकारिणी बैठक नांदेड येथे संपन्न

Chief Editor

Leave a Comment