नांदेड(प्रतिनिधी): देगलूर तालुक्यातील दरेगाव येथील रहिवासी गोविंदराव रामजी गायकवाड वय (९५) वर्ष यांचे दिनांक १२ ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पार्थिव देहावर दिनांक १३ ऑक्टोबर मंगळवार रोजी मूळ गाव दरेगाव ता.देगलूर येथे दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ,सहा मुले नातवंडे असा मोठा परिवार आहे.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड यांचे ते वडील होत.
