एम सी आर

स्वारातीम विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा; सात दिवसीय योग शिबिराची सांगता

Uncategorized

नांदेड: (डॉ. प्रवीणकुमार सेलूकर)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. याचबरोबर दि. १५ ते २१ जून २०२६ या कालावधीत आयोजित सात दिवसीय विशेष योग शिबिराचीही यशस्वी सांगता झाली.

जागतिक योग दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर या विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरादरम्यान दररोज सकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विविध योगासने व प्राणायामाचा नियमित सराव केला.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सकाळी ६ वाजल्यापासून विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवत शिस्तबद्ध पद्धतीने योगासने आणि प्राणायामाचा सराव केला.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारोती गायकवाड, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रकाश निहलानी, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे सदस्य डॉ भीमा केंगळे तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने यांच्यासह विद्यापीठातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सध्याच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. योग ही केवळ व्यायामपद्धती नसून निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवनशैलीचा आधार असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने यांनी सर्व सहभागी, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यापीठ परिसरात दिवसभर उत्साह, सकारात्मकता आणि आरोग्य-जागरूकतेचे वातावरण अनुभवायला मिळाले.
—–+++++——

Share

Related posts

श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सवाचे आयोजन

Chief Editor

नाथ संप्रदायातील एक सहज संत: ह भ प श्री गहिनीनाथ महाराज औसेकर*

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठात तीन कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

Chief Editor

जिल्हाधिकारी नांदेड यांच्या दालनात दि.८ एप्रिल २०२६ रोजी दिव्यांगाच्या प्रश्नासाठी बारा बैठका एक सुनावणी घेऊन दिव्यांगास न्याय हक्क देता येत नसेल तर स्वईच्छा मरण्याची परवानगीसाठी धरने आंदोलनाचा निवेदनाद्वारे चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिला इशारा

Chief Editor

स्वच्छ यशवंत परिसर अभियान उत्साहात संपन्न

Chief Editor

राष्ट्रीय सेवा योजनेतून युवकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधता येतो- प्रा.दिलीपकुमार मटके

Chief Editor

Leave a Comment