एम सी आर

जिल्हाधिकारी नांदेड यांच्या दालनात दि.८ एप्रिल २०२६ रोजी दिव्यांगाच्या प्रश्नासाठी बारा बैठका एक सुनावणी घेऊन दिव्यांगास न्याय हक्क देता येत नसेल तर स्वईच्छा मरण्याची परवानगीसाठी धरने आंदोलनाचा निवेदनाद्वारे चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिला इशारा

Uncategorized
  • नांदेड जिल्हा प्रतिनिधी,:–
    दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नांदेड यांची भेट घेऊन दिव्यांगास न्याय हक्क मिळावा म्हणून जिल्हाधिकारी नांदेड यांनी बारा बैठका व एक सुनावणी घेऊन इतिवृतातील प्रश्न सुटले नाहित? साधे ऊतर मिळत नसल्यामुळे आपल्या दालनात दिव्यांगाना हक्क द्या ?नसेल तर स्वईच्छा मरण्याची परवानगी मिळावी म्हणून आंदोलन करण्याचा इशारा दि.९ मार्च २०२६ च्या निवेदनाद्वारे देऊन सुध्दा एका महिन्यात साधे ऊतर मिळत नसेल तर न्याय हक्क कधी ?
    नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार,गटविकास अधिकारी यांना शिष्टमंडळाने वरील विषयाबद्दल दिव्यांगांना न्याय हक्कासाठी नांदेड जिल्हाधिकारी यांनी बारा बैठका एक सुनावणी घेऊन त्यातील किती प्रश्न सुटलेत किती प्रश्न का सुटले नाहित यांचे ऊतर पंधरा दिवसांत द्या नसेल तर स्वईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत तहसिलदार दालनात आंदोलन करण्याचे निवेदन दि.१७ फेबु.ते ८ मार्च पर्यंत सर्व तहसिलदाराना पंधरा दिवसांचा वेळ देऊन दिड महिन्यात साधे ऊतर तहसिलदार देत नसतील ते काय दिव्यांगाना मरण्याची मुक संमती देत आहे काय? बारा बैठकितील प्रोसडिग चे ऊतर न देणाऱ्या कनिष्ठावर वरीष्ठ अधिकारी दप्तर दिरंगाई कायद्याचा का वापर करीत नाहित.
    दिव्यांग ,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग, वृध्द, निराधाराना न्याय हक्कासाठी ई.स. २०२२ पासुन नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी साहेब, जिल्हाधिकारी नांदेड, सहित साठ निवेदने, मोर्चे, धरने, स्व ईच्छा मरण्याची परवानगी बे. मुध्दत धरने, आंदोलनाची दखल
    मा.जिल्हाअधिकारी नांदेड यांनी
    फक्त संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी सोबत अनेक मिंटिंग घेऊन त्यांची इतिवृत दिड महिना तयार होत नाहि संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेला पोहचत नसेल तर प्रश्न कसे सुटतील?
    वरीष्ठ अधिकारी कनिष्ठाकडुन त्या मिटिंगमध्ये झालेल्या प्रश्नाबदल पाठपुरावा का करीत नाहित? जर पाठपुरावा केलाच असेल तर कनिष्ठ अधिकारी त्यांच्या आदेश,निर्देशाचे पालन करीत नसतील तर वर्ष न वर्षी ऊतर न देणाऱ्या अधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायदा व दिव्यांगाना हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या दोषि अधिकारी यांच्यावर दिव्यांग कायद्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही वरीष्ठ अधिकारी का? करीत नाहीत?
    आंदोलन करण्याचे निवेदन दिले कि मिंटिंग लाऊन दिव्यांगाचा व प्रशासन यांचा वेळ वाया का घालवतात व दिव्यांगासाठी अनेक बैठका दाखऊन दिव्यांगासाठी न्याय देणारे म्हणून सहानुभुती मिळाली म्हणून देखावा न करता दिव्यांग सचिव मा. तुकाराम मुंडें सारखे निर्णय आदेश, निर्देश देऊन दिव्यांग व जनतेचे मने अधिकारी जिंकावी व दिनदुबळ्याचा आर्शिवाद प्रशासकिय अधिकारी यांनी घ्यावा.
    जर दिनदुबळ्या दिव्यांग वृध्द निराधाराना हक्क देता येत नसेल तर आम्हा दिव्यांगाना जंगली प्राण्यांप्रमाणे जिवन जगने शक्य नसल्यामुळे आम्हा दिव्यांगाना या जन्मातुन मुक्त करण्यासाठी आम्हा दिव्यांगान स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळावी म्हणून शासन प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी दि.८ एप्रिल २०२६ रोजी नांदेड जिल्हाधिकारी दालनात धरने आंदोलनाचा इशारा दिव्यांंग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ. चंपतराव डाकोरे पाटिल, सुधाकर पिलगुंडे, दिंगाबर लोंणे,शेख मुस्ताक, गुलाबराव जोगदंड, शिवाजी हंबर्डे,विद्याधर गिरी, सखाराम बरिदे, पठाण शेरखॉन,दत्तात्रय पांढरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share

Related posts

लोकशाही मूल्य रुजविण्यासाठी युवा संसद महत्त्वाची ठरते : श्रीमती चंद्रकला रावळकर

Chief Editor

प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे हैदराबाद येथे राष्ट्रस्तरीय प्लॅटिनम पारितोषिकाने सन्मानित

Chief Editor

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन

Chief Editor

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चार चिमुकल्यांचा बळी; कुटुंबीयांना २० लाख मदत द्या — डॉ. मुजाहिद खान

Chief Editor

यशवंत युवक महोत्सवातील बोधचिन्ह स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

माता रमाई महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पॅम्प्लेटचे उत्साहात उद्घाटन

Chief Editor

Leave a Comment