एम सी आर
Uncategorized

प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे हैदराबाद येथे राष्ट्रस्तरीय प्लॅटिनम पारितोषिकाने सन्मानित

नांदेड:(दि. १ जून २०२६)
यशवंत महाविद्यालयास राष्ट्रीय स्तरावरील भारत एन्व्हॉर्मेन्ट प्रोग्राम: भारत सस्टेनेबल कॅम्पस मिशन-२०२६ अंतर्गत यशस्वी सहभाग घेतलेल्या विविध कृतिशील व नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल प्लॅटिनम सस्टेनेबल कॅम्पस पारितोषिक दि. १ जून रोजी ग्लोबल पीस ऑडिटोरियम, हैदराबाद येथे माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
सोहळ्यास २६ घटक राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील जवळपास एक हजारपेक्षा जास्त सदस्यांचा सहभाग होता. सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासकीय पदाधिकारी, शिक्षणतज्ञ, कुलगुरू, डीआरडीओ, एआयसीटीई, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अशासकीय संघटनेतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
यशवंत महाविद्यालयाने पर्यावरण संवर्धन, झिरो प्लास्टिक, ग्रीन कॅम्पस मिशन अशा एकूण आठ उपक्रमात रिसर्च हाइट्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने १६८ विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण आणि यशस्वी कृतिशील उपक्रमांनी सहभाग नोंदविला होता. या उपक्रमात भारतातील जवळपास प्रत्येक घटक राज्यातील उच्च शिक्षण संस्थांनी सहभाग घेतला होता.
विविध उपक्रम प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, हरित कॅम्पस हे केवळ शिक्षणाचे स्थान नसून ज्ञान आणि निसर्ग यांच्यातील सुसंवादाचे जिवंत उदाहरण असल्याचे ध्येय केंद्रबिंदू मानून डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव यांच्या समन्वयाद्वारे संपन्न झाले. यामध्ये यशवंत महाविद्यालय ते भाग्यनगर समुदाय जनजागरण रॅली आणि भाग्यनगर परिसरात विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. बाबानगर परिसरात झिरो प्लास्टिक ड्राईव्ह अंतर्गत शासकीय रुग्णालयात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. कॅम्पस ग्रीन ॲक्शनअंतर्गत बोटॅनिकल गार्डनमध्ये वृक्षारोपणाबरोबरच कचरा व्यवस्थापन आणि जल पुनर्वापरावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे पोस्टर सादरीकरण, महाविद्यालयाचे ग्रीन ऑडिट, सस्टेनेबल आयडिया अँड सोल्युशन सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना नोंदविण्यात आल्या.
‘यशवंत ‘ च्या शिरपेचात राष्ट्रस्तरीय पारितोषिकाचा मानाने तुरा खोवल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष मा. खा.श्री.अशोकरावजी चव्हाण, उपाध्यक्ष माजी आमदार सौ.अमिताताई चव्हाण, सचिव माजी पालकमंत्री श्री.डी.पी.सावंत, सहसचिव डॉ.रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष अँड. उदयराव निंबाळकर, कार्यकारणी सदस्य अँड.आ.कु. श्रीजयाताई चव्हाण, श्री. नरेंद्र चव्हाण, श्री. पांडुरंगराव पावडे यांनी अभिनंदन केले आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यास डॉ.कैलास इंगोले, प्रा.प्रियंका शिसोदिया यांच्या समवेत ईश्वर पासवाड, आर्मीश सर्वारी, चक्रधर देशमुख, पार्थ कोरके, भावेश गोहिल, समीक्षा जैन, वैष्णवी पाटील, झार्मीन इफ्राह, निखिल सोनकांबळे, कोमल कागदेवाड या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकेतर कर्मचारी माधव डाखोरे यांची उपस्थिती होती.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.राजरत्न सोनटक्के, डॉ.रमेश चिल्लावार, डॉ. संतोष राऊत, डॉ.बी.बालाजीराव, डॉ. एम.एम.व्ही.बेग, डॉ.मदन अंभोरे, प्रा. श्रीकांत सोमठाणकर, प्रा.अभिनंदन इंगोले, डॉ.कांचन गायकवाड यांनी परिश्रम घेतले तसेच डॉ.प्रवीणकुमार मिरकुटे, डॉ.योगेश नकाते, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आदींनी सहकार्य केले.

Share

Related posts

एनएसयुआय विद्यार्थी काँग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी किरण पडलवार यांची निवड

Chief Editor

पश्चिम विभागीय खो-खो स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विजयी*

Chief Editor

संशोधनात ‘एआय’चा वापर करताना आपला विवेक वापरणे आवश्यक ,: डॉ. धर्मेश धावणकर यांचे स्वारातीम विद्यापीठात मार्गदर्शन

Chief Editor

_विद्रोही साहित्य संमेलनात प्रख्यात सिने अभिनेते मिलिंद शिंदे यांची मुलाखत ठरली लक्षवेधी

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये सेवानिवृत्त हिंदी विभागप्रमुख डॉ.अनीता दिगंबरसिंह रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांच्या सूचना महत्त्वपूर्ण: -प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे

Chief Editor

Leave a Comment