एम सी आर

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात करियर कट्टा इंडक्शन अवेअरनेस प्रोग्राम संपन्न 9

Uncategorized

परभणी: प्रतिनिधी
महाविद्यालयीन विद्यार्थिनींना केवळ रोजगारक्षम नव्हे तर रोजगार निर्माते बनविण्याच्या उद्देशाने बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात राबविण्यात येणारा करिअर कट्टाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम युवा पिढीसाठी दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरणार आहे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांनी केले.
परभणी येथील कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात 8 ऑगस्ट रोजी करियर कट्टा इंडक्शन अवेअरनेस प्रोग्राम प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला, यावेळी करिअर कट्टा परभणी जिल्हा समन्वयक डॉ. महेश जाधव यांनी पी पी टी सादरीकरण करत विद्यार्थिनींना शिक्षणाची कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता याच्याशी सांगड घालणारा करिअर कट्टा हा उपक्रम तरुणांसाठी महत्त्वपूर्ण आहे. करियर कट्टा उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या बदलत्या रोजगार जगाची गरज ओळखून योग्य ती कौशल्य व तज्ञांचे मार्गदर्शन यावर भर देण्यात येणार आहे.
बावन आठवड्याची संवाद मालिका, विविध ॲडऑन कोर्सेस, आयएएस आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला, करिअर संसद, कृषी व्यवसाय व्यवस्थापन यासारखे उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहेत कृतीतून शिक्षण आणि उद्योजक बनण्याची प्रेरणा हे या उपक्रमांचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक डॉ. गणेश जाधव सर यांनी उद्योजकता याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता, व्यवसाय नियोजन, स्टार्ट अप संस्कृती या घटकांवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचलन करियर संसदेचे पदाधिकारी नंदिनी काळे, तेजश्री चापके यांनी केले.या कार्यक्रम प्रसंगी करियर संसदेतील सर्व पदाधिकारी महाविद्यालयातील विद्यार्थिनी व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Share

Related posts

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची प्रदेश कार्यकारिणी बैठक नांदेड येथे संपन्न

Chief Editor

विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अनुभवला तिबेटियन सिनेमा ‘द कप’* माध्यमशास्त्र संकुलाच्या कॅम्पस फिल्म क्लबचा उपक्रम

Chief Editor

ग्रामीण मातंग स्त्री ग्रंथास राज्यस्तरीय पुरस्कार

Chief Editor

यशवंत इमॅजिनेशिया : उत्सव कलांचा!’ कला प्रदर्शन उत्साहात संपन्न

Chief Editor

पीएच.डी. कोर्सवर्क ऑक्टोबर २०२६ परीक्षेसाठी अर्ज भरण्याचे आवाहन

Chief Editor

विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी OJT व Internship महत्त्वपूर्ण : डॉ. अशोक महाजन

Chief Editor

Leave a Comment